Devendra Fadnavis : 250 'ई-बस'साठी लवकरच निधी देणार

Nagpur
NagpurTendernama

नागपूर (Nagpur) : नागपूर महापालिकेच्या ‘आपली बस’ सेवेच्या ताफ्यात आणखी 250 ई-बसचा समावेश होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला 250 बसेस देण्याची घोषणा केली. तर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी पर्यावरणपूरक वातानुकूलित बस सेवा ही नागपूर शहरातील नव्या युगाची सुरूवात असल्याचे गौरवद्गार केंद्रीय परिवहन, महामार्ग विभाग मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.

Nagpur
Devendra Fadnavis : वॉशरीजमध्ये नाकारलेल्या कोळसा विक्रीची तपासणी

नागपूर स्मार्ट सिटीद्वारे मनपाला प्रदान करण्यात आलेल्या वातानुकुलीत ई-बसेसचे लोकार्पण नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत रविवारी पार पडले. यावेळी फडणवीस यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या ई-बसेसची संख्या वाढविण्याच्या संकल्पनेचे समर्थन केले. त्यांनी 250 ई-बसेस खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली व या बसेस तात्काळ घेण्याचेही सूचित केले. याशिवाय शहरात अद्ययावत परिवहन सेवा निर्माण व्हावी यादृष्टीने कार्यवाही करण्याची त्यांनी सूचना केली. मेट्रोप्रमाणेच ‘आपली बस’ कुठल्या बस स्थानकावर किती वेळेत पोहोचणार याची माहिती देणारे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे त्यांनी सूचित केले. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून परिवहन सेवा चालविल्यास त्याला आणखी जास्त प्रतिसाद मिळेल, असेही फडणवीस म्हणाले.

Nagpur
Nagpur : शस्त्राच्या धाकावर केबल चोरी; सरकारी कार्यालयात सेवा ठप्प

मेट्रो व ‘आपली बस’ चे तिकीट एकच करावे : गडकरी

नितीन गडकरी यांनी नागपूर शहरात पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेसाठी नागपूर स्मार्ट सिटीने घेतलेल्या पुढाकाराबद्दल स्मार्ट सिटी आणि मनपाचे अभिनंदन केले. त्यांनी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये चढण्या-उतरण्यास सोयीस्कर बसचा समावेश करण्याची सूचना केली. याशिवाय पूर्णत: ई-तिकीटवर आधारित परिवहन सेवा करणे तसेच मेट्रो व ‘आपली बस’ची तिकीट एकाच कार्डवरून काढली जाईल, असे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे सूचित केले. भारत सरकारच्या ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ नुसार 15 वर्ष जुनी मनपातील सर्व वाहने ‘स्क्रॅपिंग’मध्ये काढण्याचे त्यांनी निर्देशित केले. जेवढे जास्त ‘स्क्रॅपिंग’ होईल. तेवढे पर्यावरणाचे संरक्षण करता येईल व नवीन पर्यावरणपूरक वाहनांचा समावेश सुद्धा करून घेता येईल, असेही ते म्हणाले. नागपूर शहर प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने ई-बस हे उत्तम पाउल आहे. नागपूर शहरासाठी राज्याचे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी 1 हजार कोटी लॉजिस्टिक हबसाठी दिले आहेत. लॉजिस्टिक हबच्या माध्यमातून नागपूर शहर स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त होण्याकरिता फायदा होईल, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

Nagpur
Nagpur : तीन एकर जागेत उभारण्यात येणार स्मार्ट पोलिस स्टेशन

कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी अद्ययावत तंत्रानावर आधारित पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेमुळे शहरातील नागरिकांचा प्रवास आरामदायी होईल, अशी अशा व्यक्त केली. उन्हाळा सुरू होत असताना मनपाद्वारे वातानुकूलित पर्यावरणपूरक विद्युत बसेसचे लोकार्पण होणे ही महत्त्वाची बाब असल्याचे नमूद केले. नागपूर स्मार्ट सिटीकडून प्राप्त 40 विद्युत बसेस पाठोपाठ जूनपर्यंत आणखी 144 विद्युत बसेस प्राप्त होणार आहेत. याशिवाय मोरभवन, हिंगणा आणि वाठोडा डेपोला अद्ययावत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरणरपूरक अद्ययावत वातानुकूलित वाहतूक व्यवस्था, अपडेटेट डेपो हे सर्व साकारताना ‘आपली बस’च्या तिकीट दरात कुठलिही वाढ केली नाही, प्रवाशांचा खिशाला ओझे दिले नसल्याचेही आयुक्तांनी नमूद केले. त्यांन शहरात जास्तीत जास्त विद्युत बसेसचे संचालन केल्यास मनपाचा तोटा कमी होउन फायदा होईल व त्यासंबंधी प्रस्ताव देण्यास असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तांच्या मागणीवरून 250 बसेससाठी निधीची घोषणा केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com