Nagpur : शस्त्राच्या धाकावर केबल चोरी; सरकारी कार्यालयात सेवा ठप्प

Nagpur
NagpurTendernama

एकता ठाकूर गहेरवार

नागपूर (Nagpur) : बीएसएनएलच्या (BSNL) केबल चोरीमुळे उपराजधानीच्या सर्वच सरकारी कार्यालयात फोन सेवा बंद पडल्यामुळे कोट्यवधीच्या नुकसानीचा फटका प्रशासनाला पडला आहे. विशेष म्हणजे सर्वच सरकारी कार्यालयात लागलेले 1470 फोन बंद पडल्यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि लोकांना मोठा त्रास होत आहे.

Nagpur
'झोपु' प्रकल्पांच्या अडचणी सोडविण्यासाठी समिती : देवेंद्र फडणवीस

बीएसएनएलच्या सिविल लाईन स्थित केंद्रीय तार घर येथे तीन वेळा चोरी झाली. माहितीनुसार 8 मार्चला कॉपर केबल चोरी झाल्यामुळे नागपूरच्या सर्वच सरकारी कार्यालयात फोन सेवा ठप्प पडली होती. त्यामुळे सर्वच सरकारी कार्यालयात अचानक फोन बंद पडल्यामुळे फोनवर सुरु असणारे कामकाज पूर्णपणे थांबले आणि त्यामुळे भारतीय रिजर्व बँक, हाईकोर्ट, नागपूर आयुक्त कार्यालय, ट्रॅफिक विभाग, नागपूर आकाशवाणी केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिति आणि सर्वच सरकारी बँका असे शेकडो सरकारी कार्यालयात फोन सेवा बंद असल्यामुळे कोटींचे महसूलाचे नुकसान सरकारला परवडणार नाही. विशेष म्हणजे मागील 16 मार्चपासून फोन सेवा आताही बंदच आहे.

Nagpur
Devendra Fadnavis : उजनीसह 5 धरणातील गाळ काढण्यासाठी लवकरच टेंडर

जी-20 च्या नावावर पोलिस बंदोबस्त असताना चोरी झाली कशी?

प्रशासकीय कार्यालयाचा हब मानल्या जाणाऱ्या सिविल लाईन परिसरात स्थित बीएसएनएलच्या केंद्रीय तार घर येथे एक नाही दोन नाही तर चक्क 3 वेळा कॉपर केबल चोरी झाले आहे. तेही सिविल लाईन परिसरात असलेल्या बिल्डिंगमध्ये आणि मुख्य म्हणजे उपराजधानीत 20 आणि 21 मार्चला जी-20 आंतरराष्ट्रीय परिषद होणार असल्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त जागोजागी करण्यात आला आहे, तरीसुद्धा दहा ते बारा गुंडांची टोळी अनेक अवजार आणि शस्त्र घेऊन केंद्रीय तार घर येथे आतमध्ये प्रवेश करुन चक्क 3 ते चार तासात अंडरग्राउंड कॉपर केबल चोरून नेतात. तीन वेळा चोरी झाली असून, तरीसुद्धा पोलिस प्रशासन जागा का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण वारंवार जर असेच कॉपर केबल चोरीला गेले तर प्रशासनच्या महसुलावर याचा मोठा परिणाम होणार आणि महत्त्वाच्या कार्यालयात फोन सेवा ठप्प पडल्यामुळे लोकांना सुद्धा त्रास सहन करावे लागेल.

Nagpur
Nashik : जलजीवनच्या विहिरींसाठी नोटरीद्वारे जागा घेतलेल्यांचे काय?

ट्रॅफिक पोलिस, नागपूर आकाशवाणी आणि हायकोर्टात होत आहे जास्त त्रास

ट्रॅफिक पोलिस विभागात 4 महत्त्वाचे फोन बंद असल्यामुळे कोणतीही महत्त्वाची बातमी कार्यालयात किंवा वायरलेसवर सांगायला त्रास होत आहे. सोबतच नागपूर आकाशवाणी केंद्रात 15 महत्वाचे फोन बंद असल्याने फोन इन आणि फोन आऊट कार्यक्रम घेण्यास अडचण निर्माण झाली आहे विशेष म्हणजे हायकोर्टात सुद्धा अनेक फोन बंद असल्याने या तिन्ही विभागाकडून बीएसएनएलमध्ये तक्रार केली गेली आहे.

Nagpur
Nagpur : तीन एकर जागेत उभारण्यात येणार स्मार्ट पोलिस स्टेशन

सर्वच सरकारी कार्यालयात 1470 फोन पडले बंद 

बीएसएनएलचे आईटीएस महाप्रबंधक यश पान्हेकर यांनी सांगितले, की उपराजधानीच्या सर्वच सरकारी कार्यालयात बीएसएनएलचे लँडलाईन लागले आहे. कॉपर केबल चोरी गेल्यामुळे सर्वच फोन बंद पडले त्यामुळे बीएसएनएलला आतापर्यंत अंदाजे 18 लाखांचा नुकसान झाले आहे. या केबल चोरीमुळे लॉ कॉलेज चौक परिसर, धरमपेठ, कलेक्टर ऑफिस, आकाशवाणी चौक, झिरो माइल, सदर, कड़बी चौक आणि सेन्ट्रल इंडिया, रिजर्व बँक ऑफ इंडिया, सेन्ट्रल इंडिया बँक आणि इतर महत्वाच्या परिसरात फोन सेवा बंद पडल्याने मोठा नुकसान होत आहे. महाप्रबंधक यश पान्हेकर यांनी सांगितले, की 3 वेळा त्यांनी पोलिसात केबल चोरीची तक्रार दिली तरी योग्य ती कारवाई करण्यात आली नाही. कारण दहा ते बारा गुंडाची टोळी शस्त्रांच्या धाकावर चोरी करते यामुळे रात्री नाईट ड्यूटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीवाचा धोका निर्माण होऊ शकतो. 

Nagpur
Nagpur : महापालिका शहरात 100 स्मार्ट ई-टॉयलेट लावणार

 सिविल लाईन परिसरात आहे केंद्रीय तार घर (CPO कम्पाउंड ) 

सात एकर जागेवर सिविल लाईन परिसरात बीएसएनएलचे केंद्रीय तार घर आहे. एकेकाळी ही बिल्डिंग कर्मचाऱ्यानी भरलेली असायची. परंतू 2020 च्या भारत सरकारच्या वीआरएस स्किममुळे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्हीआरएस घेतले. नागपूर बीएसएनएलचे आईटीएस महाप्रबंधक यश पान्हेकर यांनी सांगितले की, 2020 पर्यंत या बिल्डिंगमध्ये 970 कर्मचारी कार्यरत होते आणि त्यापैकी 570 कर्मचाऱ्यांनी व्हीआरएस घेतली. त्यामुळे उरलेल्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट करण्यात आले तेव्हापासून केंद्रीय तार घर ही बिल्डिंग रिकामी झाली कारण तिथे बोटावर मोजणारे कर्मचारी काम करतात. बिल्डिंग रिकामी असल्यामुळे चोरट्यांनी रात्री संधी साधत कॉपर केबल चोरी केले. या चोरांनी 1200 पेयर (केबल) चे 2 केबल, 1600 पेयरचे 3 केबल आणि 2000 पेयरचे 4 केबल चोरीला केले. विशेष म्हणजे हे कॉपर केबल जमिनीच्या आतून काढल्या गेले. विशेषत: सगळ्या सरकारी कार्यालयात 40 ते 50 वर्षापासून जुने कनेक्शन आहेत आणि त्याचे फोन नंबर कार्यालयीन पत्रक, लेटर हेड, विजिटिंग कार्ड आणि बॅनर इतर महत्त्वाच्या ठिकाणी सार्वजानिक केलेले आहे. विशेष करुण जी-20 च्या अनुषंगाने विरोधी मानसिकतेच्या लोकांनी सरकारी यंत्रणा हलवण्यासाठी तांत्रिक हल्ला केला असावा असाही प्रश्न सरकारी अधिकाऱ्यांना पडला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com