'झोपु' प्रकल्पांच्या अडचणी सोडविण्यासाठी समिती : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama

मुंबई (Mumbai) : झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये सरकारला सकारात्मक सूचना मिळाव्यात आणि येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढता यावा यासाठी विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील निवडक सदस्यांची समिती गठित करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत दिली.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : उजनीसह 5 धरणातील गाळ काढण्यासाठी लवकरच टेंडर

सदस्य अमित साटम यांनी अंधेरी पश्चिम येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. फडणवीस म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण च्या पात्रतेबाबत परिशिष्ट दोन मधील यादी सात दिवसांच्या आत संकेतस्थळावर देण्यात येते. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत झोपडपट्टी मध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी आधार पडताळणी सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे, त्यामुळे अपात्र लोक यात येणार नाहीत, असे फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
Eknath Shinde : 'गोदावरी' शुद्धीकरणासाठी कृती आराखडा तयार

झोपडपट्टी पुनर्विकास तसेच पुनर्वसनाबाबत प्रधानमंत्री महोदयांच्या सल्लागार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत सुद्धा सक्तवसुली संचालनालयाकडून पुनर्वसन प्रकल्पांबाबत परवानगी मिळण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या वतीने विनंती करण्यात आली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
Mumbai : बापरे! 252 कोटींचा फ्लॅट अन् 15 कोटींची स्टॅम्प ड्युटी

शांती डेव्हलपर्स आणि सर्वधर्मीय सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे पुनर्वसन होत असलेल्या सहा हजार धारकांना घर भाडे मिळवून देणार असून म्हाडाच्या धर्तीवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातही स्वयंपुनर्विकास पथदर्शी स्तरावर प्रकल्प करण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अतुल भातखळकर, अस्लम शेख यांनी सहभाग घेतला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com