Nagpur: NCI संचालक ललित टेकचंदानी वर कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप

Lalit Tekchandani
Lalit TekchandaniTendernama

नागपूर (Nagpur) : नॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूटचे (NCI) संचालक ललित टेकचंदानी (Lalit Tekchandani) यांनी क्लॅन सिटी बायस ग्रुपच्या खरीदारांची कोट्यवधींची फसवूणक केल्याची धक्कादायक बाब नॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूटच्या लोकार्पण कार्यक्रमादिवशीच समोर आली आहे.

Lalit Tekchandani
नागपूर जिल्हा परिषदेत 561 जागांची भरती; 'ही' आहेत पदे?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) कथित कार्यकर्ता ललित टेकचंदानी आणि नागपुरातील राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे (एनसीआय) विद्यमान संचालक यांच्यावर फसवणूक केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. 1950 जणांची 95 टक्के रक्कम त्यांनी बुडविल्याचा आरोप आहे.

हेक्स सिटीमध्ये 2000 मध्ये क्लॅन सिटीचे डायरेक्टर ललित टेकचंदानी, राजू कांचवाला, अरुण माखीजाणी यांच्याकडे 1950 लोकांनी 95 टक्के रक्कम देऊन फ्लॅट बूक केले होते. त्यावेळी त्यांनी 2013 साली पझेशन देऊ असे सांगितले होते. परंतु 2013 मध्ये फ्लॅट तयार झाले नाहीत. त्यानंतर 2017 मध्ये पझेशन देऊ असे सांगितले, परंतू तेव्हाही पझेशन दिले नाही. यानंतर 2022 मध्ये पझेशन देण्याचे आश्वासन दिले, परंतु पझेशन दिले नाही, असे या प्रकरणातील खरेदीदारांचे म्हणणे आहे.

मागील 6 वर्षांपासून काम बंद आहे. चेंबूरच्या कार्यालयात जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केला ऑफिस सुद्धा बंद करण्यात आले. विशेष म्हणजे राजकीय पाठबळ असल्यामुळे विरोधात तक्रार सुद्धा पोलिस घेत नाही, असा आरोपही क्लॅन सिटी बायस ग्रुपच्या लोकांनी लावला.

ललित टेकचंदानी या बिल्डरवर रेरामध्ये 182 गुन्हे दाखल झालेले आहे. कंज्यूमर कोर्टात सुद्धा 30 खटले सुरू आहे. तरी अशा व्यक्तीला नॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूटचा संचालक बनविण्यात आले, असे आरोप करणाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे गुरुवारी जामठा येथे नॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूटचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ललित टेकचंदानी एकाच मंचावर उपस्थित होते. 

Lalit Tekchandani
MahaRERA: वाईट बातमी; राज्यातील 300 हून अधिक गृहप्रकल्प दिवाळखोरीत

27 एप्रिल रोजी एका जाहीर निवेदनात कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा ललित टेकचंदानी वर कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. टेकचंदानी आणि त्याचे सहकारी गेल्या 13 वर्षांपासून लोकांची फसवणूक करत असून, पीडितांकडून घेतलेले पैसे त्यांनी परत केले नसल्याचा आरोपही पटोले यांनी केला आहे.

आरएसएसचा अशा व्यक्तींशी संबंध असल्याचा सवालही पटोले यांनी केला असून, संघटना फसवणूक करणाऱ्यांचा पक्ष आहे का? फसवणूक झालेले सर्व लोक हिंदू आहेत, काही पीडितांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण अजूनही त्यांच्या स्वप्नातील घरांसाठी पैसे देऊनही भाड्याच्या घरात राहत आहेत, असे आरोप पटोले यांनी केले आहेत.

Lalit Tekchandani
Nashik: जल जीवनच्या कामांवर राहणार डिजिटल नजर; 'हे' अॅप करणार...

हा प्रकल्प 2000 मध्ये खारघर, नवी मुंबई येथे हेक्स सिटीच्या रुपात सुरू करण्यात आला होता. ललित टेकचंदानी यांनी प्रमोट केलेल्या, हेक्स सिटीमध्ये प्रत्येकी 35 मजल्यांचे नऊ टॉवर आहेत आणि त्यांनी एक-दोन वर्षांत फ्लॅट वितरित करण्याचे आश्वासन दिले होते. हा प्रकल्प अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे लांबला गेला. प्रकल्पाचे नाव नंतर 2008-09 मध्ये क्लॅन सिटीमध्ये बदलण्यात आले आणि खरेदीदारांना 2013 मध्ये ताबा मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते. आता या प्रकल्पाची किंमत 1 हजार कोटीच्या वर पोहचली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com