Nashik: जल जीवनच्या कामांवर राहणार डिजिटल नजर; 'हे' अॅप करणार...

Nashik ZP CEO
Nashik ZP CEOTendernama

नाशिक (Nashik) : जलजीवन मिशन (Jal Jeevan Mission) अंतर्गत असलेल्या पाणी पुरवठा योजनांची कामे योजनेची कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जलजीवन मिशन वर्क क्वालिटी मॉनिटरींग प्रणाली विकसित केली आहे. या ॲप्लिकेशन बेस प्रणालीचे लोकार्पण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (ZP CEO Ashima Mittal) यांनी केले. या अँपच्या एका क्लिकवर आता सर्व पाणी पुरवठा योजनांच्या कामांची स्थिती कळू शकणार आहे.

Nashik ZP CEO
नागपूर जिल्हा परिषदेत 561 जागांची भरती; 'ही' आहेत पदे?

जलजीवन मिशनच्या माध्यमातून नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाकडून  1222 कामांना कार्यारंभ आदेश दिले असून त्यातील जवळपास ५० कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. एवढ्या मोठया संख्येने कामे केली सुरू असल्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता, उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांना या कामांना भेटी देऊन बघण्यास वेळ मिळत नाही. ठेकेदारांनी सादर केलेल्या देयकांवर सह्या करण्यातच अधिकाऱ्यांचा सगळा वेळ जात आहे. तसेच ठेकेदारांना सातत्याने वेळेत कामे पूर्ण करण्याचा तगादा लावला जात आहे.

Nashik ZP CEO
Nashik ZP: ग्रामविकास विभागात मोठी भरती; 2000 जागांसाठी लवकरच...

या घाईमध्ये चुकीची काम होऊ नये. कामांचा दर्जा तिकून राहावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या सूचनेनुसार ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे या सर्व कामांवर ऑनलाईन नियंत्रण असावे यासाठी ॲप्लिकेशन तयार केले आहे. या ॲप्लिकेशनसाठी कार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता, उपअभियंता यांना तपासणीसाठी लॉगिन देण्यात आले आहेत. तर कनिष्ठ अभियंता आणि योजनेसाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदार यांना या प्रणालीमध्ये संबंधित पाणीपुरवठा योजनेचे व्हिडिओ, फोटो तारखेनुसार अपलोड करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Nashik ZP CEO
MahaRERA: वाईट बातमी; राज्यातील 300 हून अधिक गृहप्रकल्प दिवाळखोरीत

यामुळे पाणीपुरवठा योजनेचे काम किती पूर्ण झाले आहे, कामांची सद्यस्थिती काय आहे, अपूर्ण कामे हे लक्षात येते. तसेच या कामाच्या कनिष्ठ अभियंता किती वेळा भेट दिली आहे याचे देखील मूल्यमापन करण्यात येणार आहे. या योजनेसाठी वितरण प्रणाली वेगवेगळी स्वरुपाची आहे. योजनेच्या कामांच्या यादीनुसार त्यांचे वर्गीकरण होणार आहे. या ॲप्लिकेशनवर करण्यात आलेल्या डेटाचा वापर जलजीवनच्या नियमित होणाऱ्या आढावा बैठकीत होणार आहे. त्यानुसार अभियंत्यांना प्रशासनाकडून सूचना देणे शक्य होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com