MahaRERA: वाईट बातमी; राज्यातील 300 हून अधिक गृहप्रकल्प दिवाळखोरीत

MahaRERA
MahaRERATendernama

मुंबई (Mumbai) : महारेराच्या (Maha-RERA) संकेतस्थळावरील नोंदणीकृत 308 प्रकल्पांकडून खरेदीविक्रीत दिवाळखोरी केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यात सर्वाधिक ठाणे जिल्ह्यात 100 प्रकल्प, मुंबई उपनगरातील 83, पुणे जिल्हा ६३ आणि मुंबई शहरातील 15 प्रकल्पांचा समावेश आहेत. महारेराने अशांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरवात केली आहे.

MahaRERA
Nashik ZP: ग्रामविकास विभागात मोठी भरती; 2000 जागांसाठी लवकरच...

घर खरेदी विक्री व्यवहारात पारदर्शकता यावी, यासाठी महारेराची स्थापना करण्यात आली. महारेराला यानंतर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला. प्रकल्प उभारणाऱ्यांकडून खरेदी विक्रीत दिवाळखोरीचे प्रकार वाढले आहेत. विविध बँका, वित्तीय संस्था, या क्षेत्रातील पतपुरवठा करणाऱ्या इतर घटकांनी राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणामार्फत राज्यातील सुमारे 308 प्रकल्पांवर दिवाळखोरीचा ठपका ठेवत कारवाईला सुरवात केली आहे.

MahaRERA
Samruddhi Mahamargचे पाऊल पुढे; शिर्डी-भरवीर 80 किमीचा टप्पा पूर्ण

महारेराकडील नोंदणीकृत 308 प्रकल्पांपैकी 115 प्रकल्प सध्या सुरू आहेत. 32 प्रकल्पांत 50 टक्के पेक्षा जास्त नोंदणी झाली आहे. उर्वरित 193 प्रकल्प बंद झाले आहेत. त्यातील 150 प्रकल्पांतही 50 टक्के पेक्षा जास्त नोंदणी करण्यात आली आहे. तर 83 प्रकल्पांत आणि व्यपगत झालेल्या 43 प्रकल्पांत 50 टक्के पेक्षा कमी नोंदणी झाल्याचे महारेराच्या संकेतस्थळावरून दिसून येते.

MahaRERA
पुणे तिथे काय उणे! रस्ता सिमेंट कि डांबरी या वादात काम झाले ठप्प

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाणे जिल्ह्यात 308 प्रकल्पांपैकी सर्वात जास्त म्हणजे 100 प्रकल्प आहेत. मुंबई उपनगरातील 83, मुंबई शहरातील 15 प्रकल्पांचा यात समावेश आहेत. पुणे जिल्ह्यातील 63, पालघर 19, रायगड 15, सोलापूर 4, अहमदनगर ५ तर उर्वरित नागपूर, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर आणि सांगली या जिल्ह्यांतील प्रकल्पाचा समावेश आहे.

MahaRERA
देशात नागपूरचाच वाजणार डंका! ...असे का म्हणाले Devendra Fadnavis?

राज्यातील व्यपगत प्रकल्पांची संख्या 193 आहे. पुणे 55, मुंबई उपनगर 52, ठाणे 50, पालघर 17, रायगड 7, मुंबई 5, सोलापूर 3, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यातील प्रत्येकी एका प्रकल्पाचा यात समावेश आहे.

महारेराच्या नोंदणीकृत 308 प्रकल्पांपैकी 115 हे सुरू असलेले प्रकल्प आहेत. मुंबई उपनगर 31, मुंबई शहर 10, ठाणे भागातील 50, पुणे आणि रायगड प्रत्येकी 8, अहमदनगर 5, पालघर 2 आणि सोलापूरमधील अशा एका प्रकल्पाचा यात समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com