Hasan Mushrif : 'GMC'मध्ये होणार डॉक्टर आणि नर्सिंग विभागात हजारो पदभरती

Job
JobTendernama

नागपूर (Nagpur) : 1947 साली स्थापना झालेल्या GMCचा अमृत महोत्सव कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. या कार्यक्रमात देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. शकुंतला गोखले मेमोरियल लेक्चर हॉलचे उदघाटनही राष्ट्रपतींनी केले. यावेळी पोस्ट मास्टर जनरल यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींच्या हस्ते एका टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. तर कॉफी टेबल बूकचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

Job
Exclusive : दादा भुसेजी चाललंय काय?; अतिरिक्त बेंचेस असताना ZP शाळांच्या नावाने खरेदीसाठी 5 कोटी (भाग-3)

मेडिकलमध्ये करणार हजारो पदभरती - वैद्यकीय शिक्षण मंत्री 

मेडिकलच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी मेडिकलमध्ये हजारो संख्येने पदभर्ती केली जाणार असल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, डॉक्टरांचे 1432 पद भरले जातील तर, बीएससी नर्सिंग कोर्स सुरु केले जाणार आहेत. आणि नर्सिंग विभागात 5 हजार 82 पद भर्ती करू अशी माहिती त्यांनी दिली.  सध्या मेडिकल मध्ये 3 हजार 700 डॉक्टर व कर्मचारी कार्यरत आहे. नवीन प्रकल्पांच्या विकासकामांसाठी 4 हजार कोटींचे  लोन राष्ट्रीय बैंकेकडून स्वीकृत झाल्याची माहिती त्यांनी दिली, तर जापान मधून सुद्धा लोन घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले. जेणेकरून हे प्रकल्प आंतराष्ट्रीय बनू शकेल.

Job
Nagpur : 'समाज कल्याण'चा कारभार! कंत्राटदार मधल्या मध्येच 'असे' कमावणार कोट्यवधी

मेडिकल मध्ये बोर्नमेरो ट्रांसप्लांटची होणार सुरुवात : गडकरी 

भारतात नागपुरची चौथी विशेषता ही गवर्नमेंट मेडिकल कॉलेज (GMC) आहे. असे प्रतिपादित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मेडिकल च्या अमृत महोत्सव कार्यक्रमात केले. सोबतच त्यांनी सांगितले की, नागपूर च्या GMC मध्ये बोर्नमेरो ट्रांसप्लांट ची सुरु करू असा विश्वास मेडिकल चे डीन डॉ राज गजभिये यांनी दिला आहे. आणि लवकरच याची सुरुवात होईल. सोबतच गडकरी म्हणाले की लाखो लोकांना मेडिकल ने जीवनदान दिले आहे. आणि मला सुद्धा लहानपणी  जन्म झाल्यानंतर तब्बेत खूप सीरियस होती तेव्हा मेडिकल च्या डॉक्टरांनी त्यांचे जीव वाचविले होते. पुढे ते म्हणाले की, विदर्भाच्या  भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या चार जिल्ह्यात शेड्यूल कास्ट व ट्राइबल जातीमध्ये सिकलसेल व थैलेसीमिया चे आजार जास्त दिसून येते. अश्या आजारग्रस्तासाठी मेडिकल मध्ये सिकलसेल व थैलेसीमिया वर उपचार सुरु झाले पाहिजे. जनतेला अत्याधुनिक सुविधा प्राप्त होणार असा नागपुर मेडिकल हब बनला आहे. एक संस्थेने 75 वर्ष पूर्ण करणे हे एक इतिहास आहे. वर्तमान स्थितीत भविष्याचे काम करत असतांना गौरवमय इतिहासाला विसरु नए असेही ते म्हणाले. या अमृत महोत्सव कार्यक्रमात GMC मध्ये शिक्षण घेणारे चार माजी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. त्यापैकी 96 वर्षीय डॉ. बी जे सूबेदार हे पहिल्या बैच चे डॉक्टर आहेत आणि अजुनही त्यांची प्रैक्टिस सुरु आहे. डॉ दिनकर कुकड़े, डॉ. रवि लिमये आणि प्रोफेसर डॉ. प्रमोद गिरी सम्मानित करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com