राज्यात 5 नवीन डी फार्मा कॉलेज होणार सुरु; त्यापैकी चार विदर्भात

D Pharmacy
D PharmacyTendernama

नागपूर (Nagpur) : राज्यात 2023-24 या शैक्षणिक सत्रापासून पाच नवीन खासगी डी फार्मा महाविद्यालये सुरू होणार आहेत. या स्वायत्त आणि विनाअनुदानित महाविद्यालयांपैकी चार विदर्भात आणि एक कोल्हापुरात सुरू होणार आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या मान्यतेनंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागानेही नवीन महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. या संस्थांमध्ये 60 जागा उपलब्ध असतील. बारावीनंतर विद्यार्थ्यांना फार्मसीचा डिप्लोमा कोर्स करता येणार आहे. सध्या राज्यात 224 फार्मसी महाविद्यालये आहेत. प्रवेश सुरू करण्यापूर्वी संबंधित संस्थांना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या अटींची पूर्तता करावी लागते. संस्थांना अटींचे पालन करावे लागेल. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून संलग्नता घ्यावी लागेल. संस्थांना जास्त शुल्क आकारताना, शिक्षक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना नियमांचे पालन करावे लागेल.  

D Pharmacy
पंढरपूर, अक्कलकोटला CM शिंदेंचे मोठे गिफ्ट; तब्बल 440 कोटींच्या..

आयआयटी बॉम्बे अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारेल भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने (DTE) राज्यातील तांत्रिक उच्च शिक्षण संस्थांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आयआयटी बॉम्बे येथे नुकतीच कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात राज्यातील 15 शासकीय अभियांत्रिकी संस्थांमधील 60 प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलताना आयआयटी संचालक आणि प्राध्यापक सुभाषिस चौधरी यांनी आशा व्यक्त केली की, परस्पर सहकार्याचा फायदा केवळ राज्यातील उच्च तांत्रिक संस्थांनाच नाही तर आयआयटी बॉम्बेलाही होईल. डीन (संशोधन आणि विकास) प्राध्यापक मिलिंद अत्रे म्हणाले की, अनेक क्षेत्रे आहेत जिथे आयआयटी बॉम्बे आणि राज्य उच्च शिक्षण संस्था एकत्र काम करू शकतात. गुणवत्ता वाढीसाठी आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांच्या हस्ते झाले.

D Pharmacy
Nagpur: लखमापूर प्रकल्पासाठीचा 40 कोटींचा निधी कधी मिळणार?

प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक राज्यातील इतर उच्च शिक्षण संस्थांमधील प्राध्यापकांना प्रशिक्षण देतील तसेच संस्थांच्या विद्यार्थ्यांसाठीही आयोजित केले जातील. आयआयटी बॉम्बे अभ्यासक्रम सुधारण्यासही मदत करेल. याशिवाय इतर संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी आयआयटी बॉम्बेच्या लॅबचा वापर करण्यास परवानगी देण्याचाही विचार केला जात आहे. आयआयटी बॉम्बेच्या सहकार्याने उच्च शिक्षण संस्थाही संशोधनाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. राज्यातील उच्च तंत्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षण आणि संशोधनातील सुधारणा राबविण्याचा उद्देश आहे. कार्यशाळेदरम्यान, इतर शैक्षणिक संस्थांमधील प्राध्यापकांना आयआयटी बॉम्बेने विविध क्षेत्रात घेतलेल्या कौशल्याची माहिती देण्यात आली.

D Pharmacy
Nagpur : कोट्यावधीच्या कामासाठी ZPकडून ऑफलाईन टेंडर काढल्याचा आरोप

येथे होणार डी फार्माचा अभ्यास 

आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नंदनवन, जगनाडे चौक, नागपूर जे व्ही इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, राजुरा, गडचांदूर रोड, चंद्रपूर माऊली इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, बांधे कॅम्पस, कोंडला रोड, वाशीम संत गजानन महाराज फार्मसी कॉलेज, शिवाजी चौक रोड, चंद्रपूर श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ अलका पाटील फार्मसी कॉलेज, काळे बाजार भोगाव रोड, कोल्हापूर

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com