Amravati : ZPच्या 'या' 25 शाळा बनतील आदर्श; खर्च केले जाणार 22 कोटी

Amravati ZP
Amravati ZPTendernama

अमरावती (Amravati) : राज्य सरकारकडून अमरावती जिल्ह्यातील 25 शाळा आदर्श शाळा म्हणून साकारण्यात येत आहेत. यासाठी 22 कोटी 37 लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. या शाळांमध्ये अत्याधुनिक पद्धतीने बांधकाम करण्यात येणार आहे.

Amravati ZP
Mumbai News : संपूर्ण गोखले पूल खुला होण्यासाठी मुंबईकरांना पुढील वर्षाची प्रतीक्षा

राज्य सरकारने 2022-23 मध्ये जिल्हा परिषदेच्या सहा शाळांकरिता सुमारे कोटी 3 कोटी 69 लाख 30 हजार आणि 2023-24 मध्ये 19 शाळांकरिता सुमारे 18 कोटी 68 लाख 43 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अशा सुमारे 22 कोटी 37 लाख 73 हजार रुपयांच्या निधीमधून जिल्हा परिषदेच्या 25 शाळांची ओळख आदर्श शाळा म्हणून या निधीतून विकसित केली जाणार आहे. या निधीमुळे जिल्हा परिषद शाळाही इंग्रजी शाळांच्या धर्तीवर हायटेक होणार आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील 14 तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नवीन बांधकामे करण्यात येणार आहेत. या वर्गखोल्या अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात येणार आहेत. यापैकी काही शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. सध्या केवळ गतवर्षी आलेल्या निधीमधून शाळेची कामे सुरू आहेत, तर उर्वरित शाळेसाठी गत मार्च महिन्यात निधी आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही कामे सुरू हाेणार असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Amravati ZP
Nagpur : झोपडपट्टीवासियांना 50 हजार पट्टे वितरणाचा लक्ष्य कधी होणार पूर्ण?

या शाळांचा होणार विकास : 

चांदुर बाजार तालुक्याती घाटलाडकी, शिरजगाव कसबा, बेलोरा, तळेगाव मोहना, विश्रोळी, राजना पूर्णा कारंजा बहिरम, तोंडगाव ,शिरजगाव कसबा, ब्राम्हणवाडा थडी, शिरजगांव बंड, देऊरवाडा, धामनगांव रेल्वे मधील अंजनसिगी, मार्डी (तिवसा), बेनोडा (वरूड), हरम (अचलपूर), नांदुरा (अमरावती), पांढरी (अंजनगाव सुजी) टाकरखेडा (भातकुली), जळका जगताप (चांदुर रेल्वे), गांगरखेडा (चिखलदरा), येवदा (दर्यापूर), खिडकीकलम (धारणी), नेरपिंगळाई (मोर्शी), शिवणी रसुलापूर (नांदगाव खंडेश्वर) या जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या सन 2022-23 आणि 2024 या आर्थिक वर्षात 25 शाळांच्या नवीन बांधकामासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीमधून 25 शाळा आदर्श म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनवणे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com