Gokhale Bridge
Gokhale BridgeTendernama

Mumbai News : संपूर्ण गोखले पूल खुला होण्यासाठी मुंबईकरांना पुढील वर्षाची प्रतीक्षा

Mumbai News मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची एक बाजू २६ फेब्रुवारी रोजी सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना दुसरी बाजू सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, कामातील विलंबामुळे हा संपूर्ण पूल वाहतुकीला खुला होण्यासाठी पुढील वर्ष उजाडणार आहे. संपूर्ण काम पूर्ण होण्याचा कालावधी सुमारे सहा महिने पुढे गेला आहे.

Gokhale Bridge
Chennai Surat Greenfield Expressway : नाशिकच्या रखडलेल्या प्रकल्पांमध्ये आणखी एकाची भर?

गोखले पुलाच्या दुसऱ्या गर्डरचे सर्व सुटे भाग मुंबईत कंत्राटदाराला दिलेल्या मुदतीत न पोहोचल्याने दुसरा गर्डर बसविण्याचा मुहूर्त सहा महिने लांबणीवर पडला आहे. आता दुसऱ्या गर्डरसाठी १४ नोव्हेंबरची वाढीव मुदत देण्यात आली आहे. गोखले पुलाची एक बाजू २६ फेब्रुवारी रोजी सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना दुसरी बाजू सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. बांधकाम सुरू झाल्यानंतर एक बाजू सुरू होण्यास १५ महिने लागले. एप्रिलच्या सुरुवातीला दुसऱ्या बाजूच्या गर्डरचे भाग दिल्लीहून आणण्यास सुरुवात झाली.

३१ मेपर्यंत गर्डर स्थापन करून रस्ते तयार करण्याचे व ३१ डिसेंबरपर्यंत संपूर्ण पूल खुला करण्याचे नियोजन होते. दुसऱ्या गर्डरचे काही भाग आले, ते जोडण्याचे काम सुरू आहे. मात्र, सर्व भाग आले नसल्याने हे सगळे नियोजन कोलमडले आहे. आता नवीन मुदतवाढीनुसार दुसरा गर्डर १४ नोव्हेंबरपर्यंत बसवण्यात येईल. त्यानंतर रेल्वेच्या हद्दीतील कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण पूल वाहतुकीला खुला होण्याचा मुहूर्त २०२५ पर्यंत लांबणीवर पडला आहे.

Gokhale Bridge
Pune News : पुण्यातील 'या' मोठ्या सरकारी रुग्णालयात औषधांचा दुष्काळ?

पुलाच्या दुसऱ्या गर्डरचे सुटे भाग मुंबईत येण्यास उशीर झाल्यामुळे महापालिका प्रशासनाने कंत्राटदाराकडून खुलासा मागवला होता. त्यातील काही कारणे प्रशासनाला पटली नसल्याने महापालिकेने कंत्राटदाराला ३ कोटींहून अधिक दंड ठोठावला आहे. वाढीव मुदतीतही गर्डरचे काम पूर्ण न झाल्यास याहून जास्त दंड होऊ शकतो, अशी माहिती देण्यात आली.

गर्डरचे सर्व सुटे भाग आल्यानंतरच पुढील गर्डर लाँचिंगची आणि पूल खुली करण्याची सर्व कामे अवलंबून आहेत. गर्डर स्थापन करण्यासाठी क्रेन उभे करावे लागत असल्यामुळे आधी पोहोच रस्ते तयार करता येत नाहीत. सुटे भाग जोडल्यानंतर रेल्वेकडून रुळांवरील कामांसाठी ब्लॉक घेतला जाईल, त्यानंतर गर्डर स्थापन करून पोहोच रस्त्याची कामे केली जातील. अंबाला येथील कारखाना हा रेल्वे प्रशासनाने प्रमाणित केलेला आहे. त्यामुळे गर्डरचे सुटे भाग हे तेथूनच मागविण्यात आलेले आहेत. 

Tendernama
www.tendernama.com