Gondia : 2450 लाभार्थ्यांना घरकुल देण्याची योग्य अंमलबजावणी तर इतर जिल्ह्यांचे काय?

Gharkul Yojana
Gharkul YojanaTendernama
Published on

गोंदिया (Gondia) : अमृत आवास अभियानाच्या माध्यमातून गरीब जनतेला राहण्यासाठी घर बनवून दिल्या जात आहे. राज्याच्या सगळ्याच जिल्ह्यात ही घरकुल योजना राबविण्यात आली. 2022-23 अंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. आणि विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने केली. केंद्र व राज्य पुरस्कृत अशा दोन्ही आवास योजनांच्या अंमलबजावणीत उत्कृष्ट कामगिरी करत गोंदिया जिल्ह्याने नागपूर विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

Gharkul Yojana
Nagpur News : नागपुरातील नद्यांच्या 90 टक्के स्वच्छतेचा आयुक्तांचा दावा खरा आहे का?

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनांच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्ह्याने प्रथम, भंडारा द्वितीय तर चंद्रपूर जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या अंमलबजावणीतही गोंदिया जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अश्याच प्रकारे इतरही जिल्ह्यात घरकुलची योग्य अंमलबजावणी करण्याची गरज आहे. काही जिल्ह्यात तर घरकुल योजना कागदावरच राहिल्या आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव मुक्त  वसाहत योजना आदी ग्रामीण व गृहनिर्माण योजना राज्यभर राबविण्यात येतात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हा व तालुक्यांना 20 नोव्हेंबर 2022 रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनापासून राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी अमृत महाआवास अभियान 2022-23 अंतर्गत पुरस्काराने गौरविण्यात येते.

Gharkul Yojana
Gondia : धोकादायक 'या' 123 जीर्ण इमारतींवर नगरपरिषद करणार का कारवाई?

या पुरस्कार योजनेंतर्गत नागपूर विभागातील जिल्हे व तालुक्यांच्या कामगिरीवर आधारित प्रस्तावांचा अभ्यास करुन विभागीय आयुक्त बिदरी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या अंमलबजावणी व सनियंत्रण व मूल्यमापन समितीने केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रत्येकी तीन जिल्हे व तालुक्यांची निवड केली आहे. गोंदिया जिल्ह्याने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 2450 भूमिहीन लाभार्थ्यांपैकी सर्वच लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन दिली आहे. तसेच या योजनेंतर्गत मंजूर 95 हजार 291 मंजूर घरकुलांपैकी 92 हजार 972 घरकुले उभारली असून, उर्वरित 6 हजार 168 घरकुलांचे काम प्रगतिपथावर आहे. तर राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत गोंदिया जिल्ह्याने 12 हजार 576 मंजूर घरकुलांपैकी 12 हजार 240 घरकुले उभारली आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com