Gondia : धोकादायक 'या' 123 जीर्ण इमारतींवर नगरपरिषद करणार का कारवाई?

Gondia
GondiaTendernama

गोंदिया (Gondia) : नगरपरिषदेने शहरातील जीर्ण आलेल्या इमारतींचे सर्वेक्षण सुरू केले आहे. शहरात आतापर्यंत 123 इमारती जीर्ण झाल्या आहेत. या मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी तयार करून त्यांना नोटिसा दिल्या जात आहेत.

Gondia
Mumbai : बंद शासकीय दूध योजना भंगारात; लवकरच रिटेंडर

जीर्ण इमारतींमुळे पावसात धोका अधिक असतो. पावसात या इमारती कोसळण्याच्या अनेक घटना यापूर्वीही जिल्ह्यात घडल्या आहेत. आता काही दिवसांत पावसाळा सुरू होणार आहे. अशा स्थितीत जीर्ण झालेल्या इमारतींमुळे तेथे राहणाऱ्या व परिसराला लागून असलेल्या नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो. नगरपरिषदेकडून दरवर्षी शहरातील घरांचे सर्वेक्षण केले जाते, त्यानुसार जीर्ण घरांच्या मालकांना नोटिसा देण्याचे काम नगरपरिषदेकडून केले जात आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, त्यामुळे दरवर्षी जीर्ण इमारतींची यादी तयार करून पुढील वर्षीही याच इमारतींचा समावेश सर्वेक्षणात केला जातो. या इमारती कोसळून जीवितहानी झाल्यास त्यास संबंधित मालमत्ताधारक जबाबदार असेल. यासाठी आता नगरपरिषदेने मालमत्ताधारकांना पालिका कायद्यान्वये जबाबदार धरून नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे. जीर्ण झाल्याचेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. सोबतच इमारतींमुळे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल. 

Gondia
Fadnavis, Gadkari Nagpur News : फडणवीस, गडकरींच्या नागपुरात 24 तास पाणी पुरवठा योजना 7 वर्षांनंतरही कागदावरच का?

मालमत्ताधारक करत आहे दुर्लक्ष : 

शहरात असलेल्या मोडकळीस आलेल्या इमारतींमुळे नागरिकांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी नगर परिषदेकडून सर्वेक्षण केले जाते. ज्यांची घरे अतिशय जीर्ण झाली आहेत, अशा लोकांना नोटीस देऊन जीर्ण इमारत पाडण्यास सांगितले जाते. अशा नोटिसा दरवर्षीच दिल्या जातात. मात्र मालमत्ताधारक जीर्ण इमारती पाडत नाहीत. अशा स्थितीत यंदा नगरपरिषदेने इमारती पाडल्या नाहीत, तर काही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित व्यक्तीला जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. फक्त नोटिस देऊन चालणार नाही तर अश्या जीर्ण इमरतींवर बुल्डोजर चालवायला हवे. मालमत्ताधारकांना नोटिस मिळूनही अनदेखी करतात आणि दुर्घटना होते, अश्यात सामान्य नागरिकांचे मरन होते, म्हणूनच नोटिस तर दिले पण आता नगर परिषदेने बुल्डोजर चालवायला हवे अशी मागणी नागरिक करीत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com