Nagpur : अजनीचा सहा लेन पूल 2024 अखेरपर्यंत पूर्ण होणार?

Bridge
BridgeTendernama

नागपूर (Nagpur) : जीर्ण झालेल्या अजनी पुलामुळे येथे नवीन 6 पदरी उड्डाण पूल बांधण्याचे काम महारेलकडून सुरू करण्यात आले असून, 2024 च्या अखेरीस ते पूर्ण होईल, असा दावा महारेलकडून करण्यात आला आहे. त्याच्या उभारणीनंतर एकीकडे रेल्वे वाहतूक सुरळीत होईल, तर दुसरीकडे रस्ते वाहतूकही सुरळीत होईल.

Bridge
Mumbai : गौरी गणपतीलाच ठेकेदार साजरी करणार दिवाळी! 'हे' आहे कारण...

दोन टप्प्यात बांधण्यात येणार पूल

ब्रिटीशकालीन अजनी पुलाने वयाची शंभरी ओलांडली आहे. पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद केली गेली आहे. हा पूल दक्षिण आणि मध्य नागपूरला जोडणार आहे. हे पुल महत्त्वाचे असल्याने येथे अवजड वाहतूक असते. त्यामुळे कधीही अपघाताची शक्यता कायम आहे. याची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एप्रिल 2023 मध्ये पूल तोडून नवीन पूलसाठी भूमिपूजन करण्यात आले. नवीन पूल साकार करण्याची जबाबदारी महारेलकडे देण्यात आली आहे. महारेलने त्याचे बांधकाम सुरू केले आहे. 2024 च्या अखेरीस ते प्रत्यक्षात आणण्याचे आश्वासन दिले आहे. 

Bridge
Nagpur : स्थानिक ठेकेदारांना कामे द्या अन्यथा करणार आंदोलन, कोणी दिला इशारा?

हा पूल दोन टप्प्यात बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन पदरी समांतर पूल बांधण्यात येणार असून, तोपर्यंत जुन्या पुलावरून वाहतूक सुरू होईल. पहिल्या टप्प्याचे काम संपल्यानंतर जुना पूल तोडून नवीन पुलावरून वाहतूक सुरू करून आणखी तीन पदरी रस्ता तयार करण्यात येणार आहे. पूल तयार झाल्यास नागपूरकरांना खूप सोइसकर होईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com