Mumbai : गौरी गणपतीलाच ठेकेदार साजरी करणार दिवाळी! 'हे' आहे कारण...

Tender
TenderTendernama

मुंबई (Mumbai) : गौरी गणपतीच्या सणाला राज्य सरकारतर्फे वाटप होणाऱ्या ‘आनंदाचा शिधा’मुळे (Anandacha Shidha) गरिबांचा सण गोड होणार असला, तरी हा शिधापुरवठा करणारा कंत्राटदार (Contractor) मात्र, गौरी गणपतीलाच दणक्यात दिवाळी (Diwali) साजरी करणार आहे. कारण, कोणत्याही प्रकारचे टेंडर (Tender) न काढताच गुढीपाडव्याला ज्या कंत्राटदाराने हा शिधापुरवठा केला, त्यालाच गौरी-गणपतीच्या शिध्याचे वाटप करण्याच्या ४५० कोटी रुपयांच्या कंत्राटाची (Contract) लॉटरी लागली आहे.

Tender
Nashik : महापालिकेचा सिंहस्थ आराखडा सादर होणार; 'या' कामांचा समावेश

गौरी-गणपतीलादेखील आनंदाच्या शिध्याचे वाटप करण्यास मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. हा पूर्णतः नवीन प्रस्ताव असतानाही, मागील कंत्राटदारालाच हे कंत्राट देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. दरम्यान, या संदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या गौरी गणपतीला आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या सणासाठीदेखील आनंदाच्या शिध्याचे वाटप केले जावे, असा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने मंत्रिमंडळाला सादर केला होता. यासाठी स्वतंत्र टेंडर प्रक्रियाही राबविली जावी, असे देखील या प्रस्तावात स्पष्टपणे म्हणण्यात आले होते.

‘महाटेंडर’मार्फत (Mahatender) टेंडरची प्रक्रिया राबविण्यास २१ दिवसांचा कालावधी लागत असला तरी ‘Neml Ncdex eportal’ च्या माध्यमातून आठ दिवसांत टेंडर प्रक्रिया पूर्ण करता येणे शक्य आहे. टेंडर प्रक्रिया राबविल्यास स्पर्धेमुळे आणखी कमी भावात शिधा किट उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण होईल, असेही या प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले होते.

Tender
Nashik : सुमार दर्जाच्या कामांविरोधात ZP सीईओ आक्रमक; कार्यकारी अभियंत्यांना नोटीसा

महायुती सरकारने २०२२ मध्ये दसरा-दिवाळीच्या निमित्ताने शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाचा शिध्याचे वाटप केले. यामध्ये शिधापत्रिकाधाराकांना १०० रुपयांत १ किलो रवा, साखर, तेल आणि चणाडाळीचे वाटप केले जाते. सरकारच्या शिधावाटपाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने यंदा गुढीपाडवा ते आंबेडकर जयंती या काळातही या शिध्याचे वाटप केले गेले.

एखाद्या कंत्राटाच्या अंमलबजावणीचा कालावधी मुदतीपेक्षा दोन महिन्यांपर्यंत वाढवता येतो. या टेंडरमधील कलमाचा वापर करून संपूर्णपणे नवीन असलेल्या प्रस्तावासाठी देखील ही पळवाट शोधून काढत मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

तसेच एका स्वतंत्र प्रस्तावाच्या खरेदीचे टेंडर दुसऱ्या प्रस्तावाला लागू करणे चुकीचे असून, हा चुकीचा पायंडा पडत असल्याकडेही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष वेधत ४५० कोटींचे कंत्राट विनाटेंडर देण्यावर तीव्र आक्षेप घेतला.

Tender
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी का मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार?

शिधावाटप दृष्टिक्षेपात...

- राज्यातील १ कोटी ५७ लाख २१ हजार ६२९ शिखापत्रिकाधारकांना आनंदाच्या शिध्याचे वाटप केले जाते.

- शिध्यासाठी लाभार्थ्‍यांना १०० रुपये पडत असले, तरी अन्न व नागरी पुरवठा विभाग एका किटसाठी १८४ रुपये मोजते. होलसेलमध्ये या किटची किंमत १३० रुपायांपेक्षाही कमी असल्याने टेंडर काढले जावे, असा विभागाचा आग्रह होता.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com