Gadchiroli : नुसते खड्डेच खड्डे; सती नदीपात्रातील पुलाचे काम कधी होणार?

Gadchiroli
GadchiroliTendernama

गडचिरोली (Gadchiroli) : कुरखेडा तालुका मुख्यालयाजवळून वाहणाऱ्या सती नदीपात्रात मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी त्या ठिकाणी कमी उंचीचे लहान जे पूल होते ते नदीपात्रातून नष्ट करून तात्पुरता बायपास रस्ता तयार करून मोठ्या पुलाच्या पायाभरणीसाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. पण अजूनही प्रत्यक्षात पुलाचे काम सुरू झाले नाही. परिणामी पावसाळ्यात वैरागड, कोरची, मालेवाडा मार्गावरील वाहतूक ठप्प होणार आहे.

Gadchiroli
Nagpur ZP : नागरी सुविधांच्या निधीचा वाद का पोहोचला विभागीय आयुक्तांच्या कोर्टात?

पावसाळ्यापूर्वी या पुलाचे काम पूर्ण होण्याची चिन्ह नसल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे. कुरखेडा जवळील सती नदीच्या पात्रातील पूल पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास कुरखेडाला जोडणाऱ्या कोरची, मालेवाडा, वैरागड या मार्गाने होणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाअंतर्गत या मोठ्या पुलाचे काम सुरू असून मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रातील कमी उंचीच्या पूल हिवाळ्यात नष्ट करून व वाहतुकीसाठी तात्पुरता दुसरा बायपास डांबरी रस्ता बनवण्यात आला आहे. मोठ्या पुलाच्या पायाभरणीसाठी नदीपात्रात खड्डे खोदण्यात आले. पण मागील महिनाभरापासून या पुलाचे बांधकाम बंद आहे. एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. मे, जून या दोन महिन्यांत पुलाचे काम पूर्ण होणे शक्य नाही. जर पूल झाला नाही तर पावसाळ्यात वैरागड, कोरची आणि मालेवाडाच्या मार्गावर प्रचंड अडचण होणार आहे.

Gadchiroli
Mumbai : MSRDC ने का घेतला मुंबईतील 'या' 27 उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय?

वनविभागाने थांबविले पुलाचे काम : 

सती नदीपात्र परिसर वन विभागाच्या अखत्यारित असल्याने वनविभागाची परवानगी त्यासाठी आवश्यक असते. वन विभागाच्या मंजुरीनंतर वन विभागाकडे डिमांड भरावे लागते. ते डिमांड राष्ट्रीय महामार्ग विभागाने भरले नसल्याने वन विभागाने हे काम थांबविले, अशी माहिती आहे. जर मोठ्या पुलाचे बांधकाम करायचे होते तर पूर्वीच पूर्ण कागदोपत्री व तांत्रिक अटी नियम पूर्ण करून नदीपात्रातून जुना पूल नष्ट करायला पाहिजे होता. असे आता नागरिकांचे म्हणणे आहे. शासन व प्रशासनाच्या वतीने उर्वरित कार्यवाही गतीने करून पुलाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे. मार्च महिन्यात वन विभागाकडून डिमांड मिळाले त्यातील 15 मार्चला अर्धी डिमांड भरून झाली आहे. कॅम्पकडे येथे आठ दिवसांत पूर्ण डिमांड भरून युद्धस्तरावर पुलाचे काम सुरू होणार आहे. पावसाळ्यातही वाहतुकीची अडचण होणार नाही, यासाठी विभागाकडून उपाययोजना केली जाणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, गडचिरोलीचे कनिष्ठ अभियंता प्रशांत खापरे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com