महावितरणला 27 उपकेंद्रांसाठी जागाच नाही? शेतकऱ्यांना 24 तास वीजपुरवठा देण्याचा प्रश्न जैसे थे...

Mahavitran
MahavitranTendernama

अमरावती (Amravati) : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसाही वीजपुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना महावितरणकडून राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यात जवळपास 88 उपकेंद्र उभारण्यात येणार होती. परंतु महावितरण कार्यालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार सध्या 39 उपकेंद्रांसाठी जागा उपलब्ध झाली असून 27 उपकेंद्रांसाठी जागाच उपलब्ध झालेली नाही, तर उर्वरित 22 उपकेंद्रांसाठी जागा उपलब्ध झाली मात्र ज्या प्रकारची जागा आवश्यक आहे तशी ती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केव्हा दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध होईल हा प्रश्न कायम आहे.

Mahavitran
मोदीजी, नवीन उद्योग सोडाच, आहे ते सुद्धा बंद होण्याच्या मार्गावर?

वीजपुरवठा अभावी अनेक शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देणे कठीण होते. त्यामुळे बहुधा शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते. महावितरणकडून उपलब्ध होणारी वीज देखील रात्रीच उपलब्ध होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तसेच शेतकन्यांना शेतीसाठी 24 तास वीजपुरवठा देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 महावितरणकडून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शासकीय पडीक असलेल्या जमिनीवर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

Mahavitran
Mumbai : 'त्या' 25 इमारती आणि 1200 घरांच्या क्लस्टर पुनर्विकासाला स्टे; राज्य सरकार तोंडघशी

जिल्ह्यात जवळपास 365 मेगावॅट वीज निर्मिती करण्याचा उद्देश असून यासाठी जवळपास 88 उपकेंद्र उभारण्यात येणार होती, परंतु जिल्ह्यात 39 उपकेंद्रांसाठी जागा उपलब्ध झाल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली आहे. 1 मेगावॅट वीज निर्मितीसाठी आवश्यक 4 एकर जमीन सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे 1 मेगावॉट वीज निर्मितीसाठी किमान 3 ते 4 एकर जमिनीची आवश्यकता असते. जिल्ह्यात जवळपास 365 मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट असून यासाठी 1700 ते 1800 एकर जमीन महावितरणला लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com