Gondia : 'या' कुआढास-कोटीटोला प्रकल्पाचा श्रीगणेशा कधी होणार? काम अद्यापही रखडलेलेच

lift irrigation project
lift irrigation projectTendernama

गोंदिया (Gondia) : सालेकसा तालुक्यातील अतिसंवेदनशील, आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिपरिया जिल्हा परिषदअंतर्गत येणाऱ्या कोटीटोला- कुआढास येथील सिंचन प्रकल्प आपल्या भवितव्यावर अश्रू ढाळत आहे. हा प्रकल्प अस्तित्वात आल्यावर संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना याचा लाभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, या प्रकल्पाचा श्रीगणेशा केव्हा होणार? अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

lift irrigation project
Nagpur : 'येथे' लवकरच सुरु होणार एमआयडीसीचे युनिट; मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन

कुआढास-कोटीटोला सिचंन प्रकल्पाची पायाभरणी 1965-70 मध्ये माजी आमदार त्यानंतर माजी सिंचन व वित्तमंत्री महादेव शिवणकर यांनी प्रकल्पासाठी प्रयत्न केले, परंतु तांत्रिक समस्यांमुळे सदर प्रकल्पास यश आले नाही. 2009 ते 2014 मध्ये तत्कालीन आ. रामरतन राऊत यांनी कुआढास कोटीटोला सिचंन प्रकल्प सुरू करून आश्वासन दिले, परंतु त्यांनाही यश आले नाही. त्यानंतर व तेही अयशस्वी राहिले.

lift irrigation project
Mumbai : 'व्हीजेटीआय', 'आयआयटी'च्या आयडियाची कमाल; महापालिकेची तब्बल 100 कोटींची बचत

या प्रकल्पाची फाइल धूळखात असल्याचा अंदाज नागरिकांकडून लावण्यात येत आहे. आता आमदार सहषराम कोरोटे या प्रकल्पाकडे लक्ष देतील का ? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. कुआढास-कोटीटोला सिंचन प्रकल्पाचा सर्व्हे झाला आहे. प्रकल्पासाठी जागाही निश्चित करण्यात आली. सिंचन क्षमताही पाळली गेली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com