जागतिक विमान वाहतूक बाजारपेठेत आता नेतृत्व करण्याची भारताकडे क्षमता कारण...

Nagpur
NagpurTendernama

नागपूर (Nagpur) : केंद्र सरकारने गेल्या 8.5 वर्षांत  2014 मधील 74 विमानतळांच्या संख्येत आता 70 नव्या विमानतळाची भर घातली असून ती आता 148 वर नेऊन दुप्पट केली आहे. गेल्या एका दशकात भारतीय हवाई वाहतूक क्षेत्राने प्रचंड वाढ नोंदवली असून, विमानतळांची संख्या दुप्पट करण्यापासून ते भारतीय विमान कंपन्यांच्या विमानांच्या विक्रमी मागणीने जागतिक विमान वाहतूक बाजारपेठेत नेतृत्व करण्याची क्षमता भारतात असल्याचे सिद्ध केले आहे असे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले.

Nagpur
Navi Mumbai Airport : ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त; 'या' दिवशी होणार पहिल्या विमानाचे उड्डाण

नागपुरातील मिहान विशेष आर्थिक क्षेत्र  येथे एएआर इंडेमार या एअरक्राफ्ट देखभाल क्षेत्रातील कंपनीच्या नागपूरच्या विशेष आर्थिक क्षेत्र असलेल्या मिहान क्षेत्रामध्ये एमआरओ सुविधेच्या औपचारिक उद्घाटन समारंभाला संबोधित करतांना ते बोलत होते. याप्रसंगी खासदार प्रफुल्ल पटेल, इंडिगो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर प्रामुख्याने उपस्थित होते. भारतीय विमान उद्योगाच्या विकासाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकतांना सिंधीया यांनी सांगितले की, 2014 पासून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार नागरी उड्डयण क्षेत्रामध्ये क्षमता निर्माण करण्यासाठी यातील अडथळे दूर करण्यासाठी आणि प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अभूतपूर्व पावले उचलत आहे जेणे करून राष्ट्राला आवश्यक विमान वाहतूक पायाभूत सुविधा उपलब्ध होऊ शकतील. 'उडे देश का आम नागरिक' (उडान योजना) हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

Nagpur
Nagpur : विधानभवनासमोरील 'ही' इमारत सरकार घेणार ताब्यात; 67 कोटींचा निधी मंजूर

नागपुरात एव्हिएशन हब बनण्याची क्षमता : 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या केंद्रस्थानी असलेले नागपूर हे एव्हिएशन हब बनण्याची क्षमता आहे असा विश्वास व्यक्त केला. नागपूर त्याचप्रमाणे विदर्भातील एअरक्राफ्ट अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मेन्टेनन्स रिपेअर आणि ओव्हर हॉल-एमआरओ (देखभाल, दुरुस्ती आणि देखरेख) क्षेत्रात प्रशिक्षण देऊन त्यांना या क्षेत्रात रोजगार मिळावा,असे आवाहनही नितीन गडकरी यांनी यावेळी केले. मिहानच्या स्थापनेपासून 68 हजार अभियंतांना येथे नोकरी मिळाली असून एअरक्राफ्ट अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना जर एमआरओचे प्रशिक्षण दिले तर या एमआरओ कंपनीला प्रशिक्षित मनुष्यबळ लाभेल. मिहान विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये 38 एकर जमीन असून त्यापैकी 10 एकरावर उद्योगांसाठी वापर चालू असून  एमआरओच्या विस्तारीकरणासाठी सुद्धा भरपूर क्षमता आहे असे त्यांनी स्पष्ट केले. एअरक्राफ्ट इंधन (एव्हिएशन फ्युएल) बद्दल त्यांनी सांगितले की साखर कारखाने त्याचप्रमाणे शेतमालापासून सुद्धा बायो एव्हिएशन फ्युएल तयार करण्यासाठीची योजना आखण्याची गरज आहे. त्यामुळे किफायतशीर दरामध्ये हे इंधन उपलब्ध होऊ शकेल आणि शेतकऱ्यांना देखील त्याचा लाभ होईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com