Wardha : जलजीवन मिशनची कामे अंतिम टप्प्यात; 'या' 91 गावांना मिळणार फायदा

Jal Jeevan Mission
Jal Jeevan MissionTendernama

वर्धा (Wardha) : ग्रामीण भागातील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण होणारी भटकंती लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी प्रत्येक घरी नळ जोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. जलजीवन मिशनअंतर्गत सेलू तालुक्यातील 91 गावांमध्ये कामे हाती घेण्यात आली आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी काही कामांची पाहणी करून आढावा घेतला, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी सेलडोहच्या सरपंच रिना तिवारी, उपसरपंच मोरेश्वर मडावी, विजय खोडे, सरपंच राजेश लोणकर, सुरेंद्र गजाम, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वाघ, उपअभियंता गिराम आदी उपस्थित होते.

Jal Jeevan Mission
Mumbai : मुलूंड, डोंबिवली स्थानकांचा कायापालट होणार; 120 कोटींचा खर्च

आमदार डॉ. पंकज भोयर यांनी जलजीवन मिशनअंतर्गत सेलडोह येथे होत असलेल्या कामांची पाहणी केली. सेलडोह गावासाठी 69 लाख 71 हजार 896 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार भोयर यांनी गावात होत असलेल्या कामांची पाहणी करीत संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना करीत कामाची गती वाढविण्याचे निर्देश दिले. यावेळी आमदार भोयर यांनी तालुक्यातील अन्य गावांत होत असलेल्या कामांचा देखील आढावा घेतला.

Jal Jeevan Mission
Ajit Pawar : नाशिक जिल्ह्यातील तहानलेल्या 'या' 2 तालुक्यांचे प्रश्न मार्गी लागणार का?

जलजीवन मिशनअंतर्गत सेलू तालुक्यातील 91 गावांचा समावेश करण्यात आला आहे. यातील 17 गावांतील कामे 70 टक्क्यांवर झाली आहे. येत्या काही दिवसांत ही कामे पूर्ण होईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी आमदार भोयर यांना दिली. मंजूर असलेली कामे तातडीने सुरू करण्यात यावी, तसेच प्रगतिपथावरील कामे उन्हाळयापूर्वी पूर्णत्वास नेण्यात यावी, असे निर्देश आमदार भोयर यांनी दिले.

या गावातील कामे प्रगतिपथावर

तालुक्यातील कान्हापूर, खडकी, टाकली, शिवनगाव हिंगणी, मसाळा, सुरगाव वडगाव कला, झडशी, हिवरा अंतरगाव, आकोली, पिंपळगाव, तामसवाडा, आमगाव जंगली, धानोली गावंडे, अंतरगाव, गणेशपूर, मुंगापूर, हिवरा या गावांतील का 70 टक्क्यांच्या वर झाली आहे. हिवरा, गणेशपूर, तामसवाडा, पिंपळगाव, सुरगाव, मसाळा, खडकी येथील कामे अंतिम टप्प्यात आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com