Mumbai : मुलूंड, डोंबिवली स्थानकांचा कायापालट होणार; 120 कोटींचा खर्च

Dombivali
DombivaliTendernama

मुंबई (Mumbai) : मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या मुलुंड, डोंबिवली रेल्वे स्थानकांचा लवकरच कायापालट होणार आहे. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) मुंबई अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रोजेक्ट एमयुटीपी फेज-३ए प्रकल्पांतर्गत या दोन्ही स्थानकांच्या विकासकामांवर सुमारे १२० कोटी रुपये खर्च करणार आहे.

Dombivali
Eknath Shinde : 2030 मध्ये 'असा' होणार मुंबईचा कायापालट; मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान

डोंबिवली, मुलुंडच्या विकासकामांसाठी टेंडर मंजूर झाले आहे. अंदाजे १२० कोटी रुपये खर्च करून या दोन्ही स्थानकांचा वेगाने विकास केला जाणार आहे. त्यापाठोपाठ मध्य व पश्चिम रेल्वेवरील इतर १७ स्थानकांच्या विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेल्या डोंबिवली स्थानकाचे काम ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल. याठिकाणी ११ कोटी रुपये खर्च करून इलेक्ट्रिक कामे, सिग्नल ॲण्ड टेलिकम्युनिकेशन सेवा सुधारण्यात येणार आहे.

Dombivali
Mumbai : कोस्टल रोडसाठी आणखी 6 महिन्यांची प्रतीक्षा; खर्चातही 725 कोटींची वाढ

या सर्व स्थानकांच्या कामांसाठी टप्पे ठरविण्यात आले असून मुलुंड, डोंबिवली या स्थानकांची कामे दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहेत. डोंबिवली स्थानकातील कामांचे थ्रीडी, डिजिटल डिझाईन उपलब्ध असल्याचे एमआरव्हीसीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले आहे. या विकासकामाअंतर्गत या स्थानकांचा संगमरवरी सजावट, प्रशस्त वास्तू, आकर्षक रोषणाई असा पंचतारांकित कायापालट होणार आहे.  

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com