Devendra Fadnavis : 6 हजार कोटी, 29 सिंचन प्रकल्प अन् विदर्भाचा विकास! काय म्हणाले फडणवीस?

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama

नागपूर (Nagpur) : विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होते. यंदाही नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, द्राक्ष उत्पादक  शेतकऱ्यांना  नुकसान भरपाईसाठी भरीव मदत केली आहे. धानाचा बोनस जाहीर केला आहे. विदर्भातील 29 प्रकल्पांना प्राधान्य देत निधी देण्यात आला आहे. तसेच विविध गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत सांगितले.

Devendra Fadnavis
Nashik : झेडपीने जलजीवनच्या ठेकेदारांचे 150 कोटी थकवले; 50 टक्के कामे करूनही केवळ 444 कोटींची देयके

पुरवणी मागण्यांमध्ये 6 हजार कोटी विदर्भातील प्रकल्पांना  देण्यात आले आहेत. गोसीखुर्द प्रकल्पाला 1500 कोटी रुपये निधी दिला आहे. सरकारने विदर्भाचा प्रस्ताव मांडला, या प्रस्तावावर चर्चेदरम्यान समर्पक उत्तरे देत विदर्भाच्या विकासाचा आराखडा मांडला.

Devendra Fadnavis
Sambhajinagar : बीड बायपास देवळाई चौक ते सोलापूर हायवे रस्ता बघा कुणामुळे रखडला?

दुष्काळी भागाचा कायापालट होणार

फडणवीस यांनी सांगितले की, विदर्भात मोठ्या प्रमाणात विकास होत असून वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पामुळे दुष्काळी भागाचा कायापालट होईल. निम्न वेणा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यासाठी भूसंपादन प्रकरणातील ज्या शेतकऱ्यांचे पैसे अद्यापपर्यंत देण्यात आले नसतील, ते तत्काळ देण्यात येतील. तसेच याप्रकरणी प्रलंबित बाबींच्या अनुषंगाने अधिवेशन संपल्यानंतर 15 दिवसांत बैठक आयोजित केली जाईल, अशी माहिती, फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

विधानपरिषदेत विरोधकांनी मांडलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. सोबतच विदर्भातील प्रलंबित सिंचन प्रकल्प जलदगतीने मार्गी लावण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com