Devendra Fadnavis : उद्योगमंत्री उदय सामंतांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमने; काय आहे कारण?

Devendra Fadnavis Uday Samant
Devendra Fadnavis Uday SamantTendernama

नागपूर (Nagpur) : परकीय थेट गुंतवणूक (FDI) महाराष्ट्रात अधिक प्रमाणात यावी यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध उद्योग समूहांसमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. दाओस येथे झालेल्या परिषदेत त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनावर भर दिल्याने आम्हाला मोठ्या प्रमाणात उद्योजकांचा विश्वास संपादन करता आला, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केले.  

Devendra Fadnavis Uday Samant
Nagpur : उपराजधानीला राज्य सरकारकडून मोठे गिफ्ट; 'या' महत्त्वाच्या कामांसाठी 204 कोटी

उद्योग विभागाचे प्रगती पुस्तक राज्यातील उद्योजकांनी समृद्ध केले असून आमच्याप्रती त्यांनी दाखविलेला विश्वास हाच आम्हाला गतीने कामे करण्यासाठी प्रेरणादायी आहे. बुटीबोरी येथे उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी 88 एकर जागा गरजेची होती. ही जागा अवघ्या 48 तासांत सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून उद्योग विभागाने दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

विदर्भासाठी या प्रकल्पातून एक नवी रुजूवात होत आहे. इथल्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. शाश्वत विकासासह सामाजिक उत्तरदायित्वाचे भान जपून आम्ही शेतकऱ्यांना बार्ली लागवड व इतर तंत्रज्ञानाकडे वळवू असे पेर्नोड रिकार्ड इंडियाचे सीईओ जीन टुबूल यांनी सांगितले. 

Devendra Fadnavis Uday Samant
Tender Scam : आता नवा ट्विस्ट; ठेकेदाराला पाठिशी घालण्यासाठी BMC कडून टेंडरचे विभाजन

राज्याच्या समतोल विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रायगड हे राज्यातील गुंतवणुकीचे आकर्षण ठरले आहे. रायगडापासून कोकणातील विकासाच्या वाटा भक्कम केल्या जात आहेत. पुणे, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विविध प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ विदर्भ मराठवाड्यातील उद्योगाला, कृषी क्षेत्राला चालना मिळावी यासाठी येत्या दोन आठवड्यात पावर सबसिडी धोरण जाहीर केले जात असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com