मोर्णा नदी सौदर्यीकरणाचा विलंब पडणार 108 कोटींना

Morna River
Morna RiverTendernama

अकोला (Akola) : अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोर्णा नदीचे सौदर्यीकरण करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे (Akola Municipal Corporation) सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आला. यापूर्वी ३३८ कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळण्यास झालेल्या विलंबामुळे आता या प्रकल्पाची किंमत ४५० कोटीवर पोहोचली आहे. त्यामुळे आता खर्चाचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे. (Morna River Development Project)

Morna River
एसटीचा दररोज ४ कोटींच्या तोट्यात प्रवास; आता घेतला मोठा निर्णय

गुजरात सरकारने साबरमती नदी सौदर्यीकरण करून पर्यटन स्थळ विकसित केले आहे. त्याच धर्तीवर अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीच्या सौदर्यीकरणाचा प्रकल्प अहवाल महानगरपालिकेतर्फे २०१८ मध्ये तयार करण्यात आला होता. राज्य नदी संरक्षण समितीकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या समितीने सुचवलेल्या सुधारणांचा समावेशही या अहवाल करण्यात आला होता. तत्कालीन, राज्य शासनाने २०१८-२०१९ च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी १५ कोटी रुपयांची तरतुदही केली होती. यानंतर कोरोनामुळे या प्रस्तावावर काहीही झाले नाही. त्यामुळे राज्यातील अनेक प्रस्तावांप्रमाणेच अकोल्यातील मोर्णा नदी प्रकल्पाचा प्रस्तावही धुळ खात पडला.

Morna River
पुणे-मुंबई प्रवास आता होणार अधिक आरामदायक! एसटीचा मोठा निर्णय...

खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा व आमदार वसंत खंडेलवाल यांनी या प्रस्तावाचा पुन्हा पाठपुरावा सुरू केला. दरम्यान, जूनमध्ये या प्रकल्पाच्या अनुषंगाने राज्य नदी संरक्षण समितीने ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत किंमतीत वाढ झाल्याने सुधारित प्रकल्प अहवाल देण्याच्या सूचना करण्यात आल्यात. बैठकीतील सूचनेप्रमाणे महानगरपालिकेने सुधारित प्रकल्प अहवाल करण्याचे काम सुरू केले आहे.

Morna River
अबब! बोरघाटातही ताशी 300 किमी वेगाने धावणार 'ही' रेल्वेगाडी

सुधारीत प्रकल्प अहवालात आधीच्या प्रस्तावानुसार कोणत्याही कामात बदल करण्यात येणार नाहीत. मात्र, बांधकाम साहित्याच्या किंमती वाढल्याने सुधारीत प्रकल्प अहवाल पाठवावा लागणार आहे. त्यामुळे ३३८ कोटीचा प्रकल्प अहवाल आता ४५० कोटीच्या वर पोहोचणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com