कंत्राट देऊनही ठेकेदारांचा पत्ता नाही! पडझडीचे १० कोटी जातात कुठे?

Nagpur
NagpurTendernama

नागपूर (Nagpur) : पावसाळ्यामध्ये वादळवाऱ्यांमुळे होणारी झाडांची पडझड, वृक्ष छटाईचा पडलेला कचरा उचलण्यासाठी नागपूर महापालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) उद्यान विभागाने १० झोनमध्ये १० कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. मात्र यापैकी एकही कंत्राटदार आजपर्यंत काम करताना दिसला नाही. त्यामुळे या कंत्राटदारांवर खर्च होणारे १० कोटी रुपये दरवर्षी जातात कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Nagpur
नागपूर मनपाकडून वर्षभरात अवघे २० किमी रस्ते दुरुस्ती; १७ कोटी खर्च

शहरात झाडांच्या फांद्या, पालापाचोळ पडला तर थेट नगरसेवक कचरा वेचणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींना फोन लावतात. कोणाची नाराजी नको म्हणून ते मुकाट्‍याने काम करतात. वादळवाऱ्यामुळे पडणाऱ्या झाडे, फांद्या उचलण्यासाठी स्वतंत्र कंत्राटारांची नियुक्ती करण्यात आली आहे, हे बहुतांश नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना सुद्धा माहित नाही. मात्र अलीकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारण्यात आलेल्या माहितीतून दरवर्षी उद्यान विभागामार्फत याकरिता महापालिकेच्या झोननिहाय स्वतंत्र कंत्राटारांची नियुक्ती करण्यात आल्याचे पुढे आले आहे. या कंत्राटदारांना दरवर्षी एक कोटी रुपये दिले जातात. असे एकूण १० कंत्राटदार आहेत. त्यापैकी आजवर एकाही कंत्राटदाराला काम करताना बघितले नाही. त्यामुळे उद्यान विभागातील अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात यातून मिळणाऱ्या रकमेचे वाटप होत असावे अशी शंका व्यक्त केली जात आहे.

Nagpur
तगादा : दीड दशकापासून रखडले जंबुदीपनगर नाल्याचे काम

महापालिकेत उद्यान विभाग तसा दुर्लक्षित समजला जातो. या विभागाचे अधिकारी फारसे सभा, बैठकांमध्ये सहभागी होत नाही. या विभागाकडे कोणाचे फारसे लक्षही नसते. त्यामुळे आरामाची नोकरी म्हणून महापालिकेत या विभागाकडे बघितले जाते. उद्यानांची देखभाल दुरुस्ती, वृक्ष कटाईला परवानगी देणे हीच प्रमुख कामे या विभागाची आहेत. याशिवाय उद्यानासाठी लागणारी खरेदी, उद्यानांच्या निर्मितीसाठी नियोजन व इतर तत्सम कामे केली जातात. वरवर पाहता उद्यान विभाग फारसा चर्चेत नसला तरी कमाईच्या बाबतीत आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

Nagpur
विदर्भात ७ मोठे उद्योग उभे होणार; ४ हजार ८०० रोजगार होणार उपलब्ध

नवीन इमारतींचे बांधकाम, शहरातील प्रकल्पासाठी वृक्ष कापायचे असल्यास या विभागाची परवानगी आवश्यकत असते. जवेढी झाडे कापली जातील त्यापेक्षा दुप्पट झाडे लावावी लागतात. त्याकरिता आगावू रक्कम उद्यान विभागाकडे जमा करावी लागते. उद्यान समितीच्या बैठकीत प्रस्ताव ठेवावा लागतो. नंतरच झाडे कापण्याची मंजुरी दिली जाते. त्यापूर्वी उद्यान विभागामार्फेत संबंधित जागेची पाहणी, वृक्षांची मोजणी केली जाते. हे सर्व सोपस्कार खिसे गरम केल्याशिवाय पार पडत नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com