नागपूर मनपाकडून वर्षभरात अवघे २० किमी रस्ते दुरुस्ती; १७ कोटी खर्च

रस्ते दुरुस्तीचा वेग दिवसाला फक्त नऊ मीटर
Nagpur
NagpurTendernama

नागपूर (Nagpur) : अमरावती-अकोला महामार्गावरील ७५ किमीचा नवीन रस्ता केवळ पाच दिवसांत तयार करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. परंतु, नागपूर महापालिकेचा रस्ता दुरुस्तीचा वेग दिवसाला सरासरी नऊ मीटर असल्याचे आढळून आले. महापालिकेने वर्षभरात २२ किमी डांबरी रस्त्यांच्या दुरुस्तीचे कार्यादेश दिले. यातील अद्यापही दोन किमी रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने महापालिकेचा रस्ता दुरुस्तीचा वेग म्हणजे लाजीरवाणा विक्रमच असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

Nagpur
Good News! नवी मुंबई मेट्रोचा मुहूर्त ठरला! वाचा सविस्तर...

स्थायी समितीने काही ठिकाणी पूर्ण डांबरी रस्ता तयार करणे व काही ठिकाणी दुरुस्तीचे काम करण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार महापालिकेने २० रस्त्यांच्या दुरुस्तीचे तसेच संपूर्ण डांबरी रस्ता तयार करण्याच्या कामाचे कार्यादेश दिले होते. यातील ओंकारनगर सिमेंट रोड ते बेलतरोडी रोडपर्यंत कलोडे कॉलेजकडून जाणाऱ्या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण करण्याचे कार्यादेश होते. या ८४० मीटर रस्त्याच्या कामासाठी ४ मार्च २०२२ रोजी कार्यादेश देण्यात आले होते. या रस्‍त्याचे काम चार दिवसांपूर्वी पूर्ण झाले. दोन दिवसांत होणाऱ्या या ८४० मीटरच्या कामासाठी तीन महिन्यांचा अर्थात ९० दिवसांचा कालावधी लागला. अर्थात दिवसाला सरासरी ९ मीटरचे काम पूर्ण केल्याचे दिसून येत आहे. हा एकच रस्ता नव्हे असे १९ रस्‍त्यांची कामे तीन ते चार महिन्यांत करण्यात आली. यात काही रस्ते एक ते दोन किमीचे आहेत. कार्यादेशाची तारीख व काम संपुष्टात आल्याचा कालावधी बघितल्यास सर्वच कामांसाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकाही एका लाजिरवाण्या विक्रमाकडे वाटचाल करीत असल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे.

Nagpur
नागपूर पालिकेचा उलटा कारभार; 9 कोटी खर्चूनही 'हा' प्रश्न कायम

दोन किमीचे काम अद्यापही अपूर्ण
२० रस्त्यांपैकी २० किमीच्या १९ रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नमुद केले. परंतु जरिपटका पोलिस स्टेशन ते नारा गाव बसथांब्यापर्यंतच्या १.९ किमी रस्त्यांचे काम अद्यापही अपूर्ण आहे. या कामासाठी १२ फेब्रुवारी २०२२ ला कार्यादेश देण्यात आले होते.

२१ कोटींची कामे १७ कोटींमध्ये
रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ४० कोटींची तरतूद मागील स्थायी समितीने केली होती. परंतु, यात काही रस्ते सोडण्यात आले. केवळ २० रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे घेण्यात आली. या रस्त्यांच्या कामाची किंमत २१ कोटी ६१ लाख रुपये होती. कंत्राटदारांशी वाटाघाटीनंतर १७ कोटी ११ लाखांवर आली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com