Nagpur : दोनशे कोटींमध्ये होणार दीक्षाभूमीचा कायापालट; मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी

Deekshabhumi
DeekshabhumiTendernama

नागपूर (Nagpur) : आठ वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीचा कायापालट करण्याची घोषणा केली होती. आता आठ वर्षानंतर मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनशे कोटींच्या आराखड्यासह निविदेस मंजुरी दिली. त्यानुसार आता कार्यादेश काढण्यात येणार असल्याने दीक्षाभूमीचा चेहरामोहरा बदलण्याचा मार्ग मोकळा झाला.

Deekshabhumi
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील 'त्या' कंत्राटदाराला 'जोर का झटका'? BMC ने उचलले मोठे पाऊल

दीक्षाभूमीच्या विकासासाठी २०१८ मध्ये १०० कोटींच्या विकासाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला होता. राज्य सरकारने या आराखड्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर दीक्षाभूमी विकासाच्या दुसऱ्या टप्प्याचा १८१ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. २०१९ मध्ये या आराखड्यात तसेच अंदाजपत्रकात बदल करण्याच्या सूचना प्रधान सचिवांनी दिल्या होत्या. त्यानुसार १७८ कोटींचा सुधारित आराखडा राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता. यात पुन्हा गृह विभागाने नवीन सूचना केल्या. या सूचनांचा समावेश करून जीएसटीसह विकास आराखड्याचे अंदाजपत्रक दोनशे कोटींवर गेले. या दोनशे कोटींचा आराखडा पुन्हा शासनाकडे सादर करण्यात आला. याच वर्षी जानेवारीत या दोनशे कोटींच्या अंदाजपत्रकासह आराखड्याला राज्य शासनाने मंजुरी दिली. मार्चमध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

Deekshabhumi
Mumbai : वादग्रस्त ठरलेल्या कांजूरमार्ग मेट्रो कारशेडसाठी MMRDA ने काढले टेंडर

एप्रिलमध्ये टेंडर मागविण्यात आले. यात वायएफसी व बीबीजी या कंपन्यांना काम देण्यात आले. ५० कोटींवरील टेंडरचे अधिकार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एनएमआरडीए) असल्याने मंजुरीसाठी त्यांच्याकडे प्रकरण गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील आठवड्यात, बुधवारी (ता. ११) निविदा मंजूर केल्याची माहिती ‘एनएमआरडीए’चे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यानुसार आता कामाचे कार्यादेश काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामुळे येत्या महिनाभरात दीक्षाभूमी विकासाची कामे सुरू होऊन वर्षभरात कायापालट होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ‘एनएमआरडीए’ने कार्यादेश काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दीक्षाभूमीची सर्व कामे राज्य सरकारने ‘एनएमआरडीए’कडे सोपविली आहेत.

Deekshabhumi
Nagpur : वीज केंद्रात कंत्राटी कामगार म्हणून स्थानिकांनाच मिळणार प्राधान्य

दृष्टीक्षेपात नवीन आराखडा
- संरक्षक भिंतीचे नवीन बांधकाम
- खुले रंगमंच
- संग्रहालय
- सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्थायी व्यासपीठ
- प्रवेशद्वाराची रुंदी वाढविणे
-पार्किंगची सुविधा
- रोषणाई
- परिक्रमा मार्ग

दीक्षाभूमीच्या कामांसाठी टेंडर निघाली असून येत्या दसऱ्याच्या दिवशी, २४ ऑक्टोबरला कामाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. येत्या २४ महिन्यांत सर्व कामे पूर्ण होणार असून दीक्षाभूमीचे नवे रूप जगभरातील बौद्ध बांधवांसाठी आणखी आकर्षक होईल.
- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त, एनएमआरडीए

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com