Mumbai : वादग्रस्त ठरलेल्या कांजूरमार्ग मेट्रो कारशेडसाठी MMRDA ने काढले टेंडर

Kanjur
Kanjur tendernama

मुंबई (Mumbai) : Mumbai Metro-6 मेट्रो-६ मार्गिकेसाठी प्रस्तावित कांजूरमार्ग डेपोच्या (Kanjurmarg Metro Depot) कामासाठी जमीन सर्वेक्षण आणि इतर कामांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) टेंडर (Tender) मागविली आहेत. एप्रिल महिन्यात कांजूरमार्ग डेपोची जमीन राज्य सरकारने एमएमआरडीएला हस्तांतरित केली आहे. त्यानंतर आता एमएमआरडीएने प्रकल्प उभारणीसाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे.

Kanjur
Nagpur : पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस अन् तब्बल 12 वर्षांची प्रतीक्षा! अखेर 'तो' दिवस आलाच

स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी (पूर्व द्रुतगती मार्ग) या मेट्रो-६ मार्गिकेसाठी कांजूरमार्ग येथे एमएमआरडीएच्या माध्यमातून मुख्य डेपोची उभारणी करण्यात येणार आहे. १५ हेक्टर जागेत हा कारडेपो उभारण्यात येईल.

कांजूरमार्ग येथील डेपो उभारणीला सुरुवातीपासूनच विरोधाचे ग्रहण लागलेले असताना आता मात्र डेपो उभारणीला गती देण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. एप्रिल महिन्यात राज्य सरकारने कांजूरमार्ग डेपोसाठी ही जागा एमएमआरडीएला हस्तांतरित केली.

त्यानंतर एमएमआरडीएच्या माध्यमातून याठिकाणी सर्व्हेक्षण करण्यासाठी मिठागरे आयुक्तालयाने विरोध दर्शविला होता. मात्र त्यानंतर आता एमएमआरडीएने हे सर्वेक्षण सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा निर्णय घेतला आहे. सल्लागार नियुक्तीसाठी एमएमआरडीएने टेंडर मागविल्या आहेत. या टेंडर भरण्याची अखेरची तारीख ६ ऑक्टोबर आहे.

Kanjur
Nashik : नाशिककरांना लवकरच मिळणार खुशखबर! केंद्रीय पथकाकडून पाहणी

याबरोबरच, सर्व्हेक्षण सल्लागारासोबत इतर स्थापत्य उभारणीसह ५०६ कोटींच्या कामासाठीही एमएमआरडीएने टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे.

यासाठी जरी केलेल्या टेंडरनुसार, स्टेबलिंग यार्ड, डेपो नियंत्रण केंद्र आणि संचलन नियंत्रण केंद्र, प्रशासकीय इमारत, देखभाल आणि कार्यशाळा इमारती, सहाय्य्क सबस्टेशन, फिनिशिंग, प्लम्बिंग, जमिनीच्या विकासासाठी मातीकाम, संरक्षण भिंत, रास्ता, सेवा वाहिनी, पर्जन्यजलवाहिन्या, इ.टी.पी./ एस.टी.पी., जल पुनर्भरण/ आवश्यक कर्मचारी निवास या कामांसाठी या टेंडर जरी करण्यात आली आहे.

ही कामे पूर्ण करण्यासाठी ३० महिने म्हणजेच अडीच वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. टेंडर प्रक्रियेतील कामकाजाचा कालावधी बघता कांजूरमार्ग डेपो उभारणीसाठी अजून अंदाजे ३ वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र सद्यस्थितीत मेट्रो ६ मार्गिकेची कामे डिसेंबर २०२४पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यामुळे कारशेडच्या कामामुळे मेट्रो मार्गिका सुरु होण्यास विलंब होण्याची शक्यही वर्तवली जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com