DFBOOT म्हणजे काय? नागपूर महापालिका एकही रुपया खर्च न करता कसा उभारणार ‘तो’ प्रकल्प

Nagpur Municipal Corporation
Nagpur Municipal CorporationTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : नागपूर शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या भांडेवाडीतील महापालिकेच्या एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्प नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाची नुकतीच पाहणी केली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना प्रकल्पाची माहिती दिली.

Nagpur Municipal Corporation
Devendra Fadnavis : वीज वितरण मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राची 65 हजार कोटींची योजना

नागपूर महापालिकेचे भांडेवाडी येथे 1000 मे. टन प्रतिदिन क्षमतेचे घनकचरा प्रक्रिया केंद्र डिझाईन, फायनान्स, बांधणी, स्वमालकी, वापर आणि हस्तांतरण (DFBOOT) या धर्तीवर उभारला जात आहे. यासाठी नेदरलँड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनी आणि नागपूर महापालिकेमध्ये करार करण्यात आला आहे. या नाविन्यपूर्ण प्रकल्पाकरिता सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट कंपनी नागपूर महापालिकेकडून कुठलेही टिपिंग शुल्क न घेता स्वखर्चाने प्रकल्पाची उभारणी करत आहे. कंपनी तर्फे 30 एकर जागेवर बांधकाम करण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करुन बायोगॅस, सेंद्रिय खत, आरडीएफ यासारखे बाय-प्रॉडक्ट तयार होणार असून, त्याची विक्री करण्याचे अधिकार कंपनीला देण्यात आले आहेत. हा प्रकल्प नागपूरसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून, ड्राय फर्मेंटेशन तंत्रज्ञानावर (Dry Fermentation Technology) वर आधारित भारताचा एकमेव प्रकल्प आहे. पूर्ण क्षमतेचा प्रकल्प तयार करण्यासाठी लागणाऱ्या कालावधीमध्ये या 30 एकर जागेव्यतिरिक्त 9 एकर जागा फ्रेश वेस्ट प्रोसेसिंग Fresh Waste processing साठी सुद्धा देण्यात आलेली आहे. सध्या या जागेवर पायलट प्रोजेक्ट उभारण्यात आला आहे. या केंद्राची सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली.

Nagpur Municipal Corporation
Mumbai : 'त्या' प्रकल्पावर कट-कमिशनवाल्या गिधाडांच्या घिरट्या! मंत्री आशिष शेलारांच्या टार्गेटवर कोण?

यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अधिक्षक अभियंता डॉ.श्वेता बैनर्जी,  उपायुक्त राजेश भगत, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, स्वच्छता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ.गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त सोनम देशमुख, सुसबिडीच्या श्रीमती वृंदा ठाकूर, प्रकल्प संचालक संजय गदरे, वित्तीय संचालक विनोद टंडन, नागपूर प्रकल्प प्रमुख नितीन पटवर्धन, सल्लागार राजेंद्र जगताप व माजी नगरसेवक बाल्या बोरकर आणि दीपक वाडिभस्मे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com