Bhandara : 'या' पुलाचे बांधकाम केव्हा पूर्ण होणार? सहा वर्षांपासून बांधकाम...

Bridge
BridgeTendernama

भंडारा (Bhandara) : भंडारा व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या वैनगंगेवरील ईटान-कोलारी पुलाचे बांधकाम गेल्या सहा वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. या पुलाचे बांधकाम केव्हा पूर्ण होणार, असा सवाल परिसरातील जनतेने उपस्थित केला आहे.

Bridge
Nagpur : नागपूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना मिळणार जागतिक दर्जाच्या सुविधा; काय आहे प्लॅन?

या पुलासाठी केंद्रीय रस्ते निधीतून 137 कोटी 37 लक्ष रुपयांच्या निधीला 19 जुलै 2018 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. पुलाच्या सर्वेक्षणाचे काम 2018 मध्येच सुरू झाले आणि त्याच वर्षी दोन महिन्यानंतर या पुलाच्या बांधकामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. जवळपास दोन वर्षात या रस्त्याचे व पुलाचे काम पूर्ण होईल, असे भाकीत वर्तविले जात होते. मात्र, 6 वर्षे लोटूनही पुलाच्या बांधकामात फारसी प्रगती झालेली नाही.

Bridge
Mumbai : बीएमसी कशेळी ते मुलूंड जलबोगदा बांधणार; 350 कोटींचे टेंडर

गेल्यावर्षी मार्च 2024 पर्यंत या पुलाचे काम पूर्ण होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगितले जात होते. मात्र, वर्ष 2024 चा जानेवारी महिना लोटूनही या पुलाचे काम पूर्णत्वापासून बरेच दूर आहे. 46 वर्षांपूर्वी किटाडी ते विरली या जिल्हामार्गाच्या बांधकामादरम्यानच या पुलाच्या निर्मितीच्या हेतूने सर्वेक्षण झाले होते. काही कारणास्तव कालांतराने हा सेतू निर्मितीचा प्रस्ताव मागे पडला. मात्र, भंडारा-चंद्रपूर जिल्ह्यातील काही समाजसेवकांनी सेतू निर्माण कृती समितीची स्थापना केली. सेतूनिर्मितिमुळे चंद्रपूर- भंडारा जिल्ह्यात ये-जा करण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होणार असून दोन जिल्ह्यादरम्यान दळणवळण सोयीचे होणार आहे. ईटान-कोलारी सेतू निर्मितीमुळे शिक्षण, आरोग्य आणि इतरही बाबींसाठी चंद्रपूर जिल्ह्यात विशेषतः ब्रम्हपुरी येथे जाणे सोयीचे ठरेल. मात्र, या सेतू निर्मितीमध्ये दिरंगाई होत असल्याने शिक्षण, आरोग्य यासारख्या सोयींचा लाभ  घेण्यासाठी लांब मार्गाने जावे लागते. त्यामुळे हा मार्ग सुरु होण्याची प्रतीक्षा असल्याची प्रतिक्रिया सीमा पारधी, सरपंच, विरली खुर्द यांनी दिली.

Bridge
Mumbai : 'त्या' 25 इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

सेतू निर्माणसाठी लढ़ा सुरु :

सेतू निर्माण कृती समितीच्या माध्यमातून आम्ही लढा दिला आणि ईटान-कोलारी दरम्यान सेतू निर्मितिचा मार्ग मोकळा झाला. मात्र, 2018  पासून सुरुवात झालेल्या या पुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे, भंडारा जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात आवागमन करण्यासाठी शासनाने जलदगतीने हे काम पूर्ण करावे. अशी मागणी उद्धव कोरे, संयोजक, सेतू निर्माण कृती समिती यांनी केली. 

ईटान-कोलारी सेतूनिर्मितीमुळे

भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यादरम्यान दळणवळण सोयीचे होणार आहे. शिवाय ईटान, विरली (खुर्द) आणि विरली (बु.) या छोट्या छोट्या गावांना विशेष महत्त्व येणार असून येथे उद्योगधंदे व रोजगार निर्मितीस चालना मिळेल. मात्र, या सेतू पूर्णत्वास दिरंगाई होत असल्याने हा मार्ग लवकर सुरू करण्याची मागणी विरली (खुर्द) उपसरपंच विलास चाचेरे यांनी केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com