Mumbai : बीएमसी कशेळी ते मुलूंड जलबोगदा बांधणार; 350 कोटींचे टेंडर

BMC
BMCTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटिशकालीन असून, त्या जीर्ण झाल्याने वारंवार पाणी गळतीचा सामना करावा लागतो. पाणी गळती रोखत मुंबईला सुरळीत पाणीपुरवठा करता यावा यासाठी कशेळी ते मुलूंडदरम्यान जल बोगदा बांधण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ३५० कोटी रुपये खर्च करणार असून टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

BMC
Mumbai : बीएमसीचा 'येथे' 100 दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प; 200 कोटींचे टेंडर

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. यापैकी दोन हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा भातसा धरणातून होतो. भातसा धरणातून मुंबईला पुरवठा होणाऱ्या दोन हजार दशलक्ष लिटर पाण्यापैकी १३६५ दशलक्ष लिटर पाणी पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध केले जाते.  

BMC
Mumbai : 6 हजार कोटींच्या रस्तेबांधणीत सबटेंडर नाहीच; कंत्राटदारांची मागणी फेटाळली

त्यानंतर ते जल वाहिनीने मुंबईला उपलब्ध होते; मात्र मुंबई-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणामुळे आणि सुरक्षित पाणीपुरवठ्याच्या दृष्टिकोनातून जमिनीवर कार्यान्वित असलेल्या मुख्य जलवाहिन्यांसाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यासाठी कशेळी ते मुलुंड दरम्यान अतिरिक्त क्षमतेसह जलबोगदा बांधण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महापालिका या जल बोगद्याचा पाणीपुरवठ्यासाठी वापर करण्यास सुरुवात करणार आहे. विद्यमान जलवाहिन्यांचे जाळे हे संरक्षित (बॅकअप) म्हणून असेल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com