Nagpur : कंत्राटीकरण रद्द करा; कंत्राटी भरती विरोधात एल्गार

Nagpur
NagpurTendernama

नागपूर (Nagpur) : कंत्राटी भरती न करता कायम भरतीच्या मागणीसह इतरही मागण्यांसाठी नागपूर व नरखेड येथे भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, सत्यशोधक मूलनिवासी वारकरी महासंघ यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने मोर्चा काढण्यात आला.

Nagpur
केंद्रीय मंत्रीच म्हणतात, ठाणे जिल्ह्यात निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांची चलती

मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालून करण्यात आली. मोर्चामध्ये जिल्हा परिषद व नगर परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलमध्ये जाऊन तहसीलदार सुनील तरूडकर यांना निवेदन देऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला. 

Nagpur
Navi Mumbai एअरपोर्टला मिळणार रेल्वे कनेक्टिव्हिटी; रेल्वे, विमान वाहतूक मंत्रालयाचा उपक्रम

यावेळी करण्यात आलेल्या मागण्या :

कंत्राटी कर्मचारी भरती पूर्णपणे संपवून विहित कालावधीमध्ये कायम भरती करावी. परीक्षेसाठी घेण्यात येत असलेली भरमसाठ फी कमी करावी. राज्यातील 62 हजार सरकारी शाळांच्या खाजगीकरणाने ओबीसी, एससी, एसटी, एनटी, एसबीसी होणारा अन्याय थांबवावा. नवीन शैक्षणिक धोरणातील खाजगीकरण आणि कॉर्पोरेटायजेशन थांबवावे. समूह शाळा किंवा शाळा संकुल तयार करण्यात येऊ नये. प्रत्येक गावात शाळा राहायलाच हवी. ओबीसींची जातीनिहाय जनगणना करून त्यांचे संविधानिक हक्क प्रदान करण्यात यावे. बहुजनांचे प्रेरणास्थान पंढरपूरचे पांडुरंगाचे मंदिर बडव्यांच्या स्वाधीन करण्यात येऊ नये. बहुजन महापुरुषांचा संविधान व राष्ट्र प्रतीकांचा अपमान करणाऱ्या मनोहर भिडेवर कारवाई व्हावी.

Nagpur
Nagpur : नाला भिंत, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हवेत 241 कोटी

सरकारने शासकीय कार्यालयात खासगी संस्थांच्या माध्यमातून भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात युवक व विविध संघटनांनी एकत्र येत रविवारी आंदोलन केले. नागपुरच्या व्हेरायटी चौकातील गांधीजींच्या पुतळा येथून सरकार विरोधात घोषणाबाजी करून संविधान चौकापर्यंत रॅली काढली. रॅलीत सहभागी झालेल्या युवकांनी हाताला काळी पट्टी बांधून आणि संविधान चौकात चहा, पकोडे विकून सरकारचा निषेध केला.

पदभरतीचे कंत्राटीकरण रद्द करावे, तत्काळ शिक्षक भरती करावी आदी मागण्यांही युवकांनी केल्या. सरकार आता तहसीलदार कंत्राटी पद्धतीने भरीत आहे, पुढे जिल्हाधिकारी कंत्राटीच भरतील, असा संतापही युवकांनी यावेळी व्यक्त केला. या आंदोलनात स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया युवा ग्रॅज्युएट फोरम, परिवर्तन पॅनल, ओबीसी युवा अधिकार मंच, ओबीसी जनमोर्चा, महाविधी लॉ असोसिएशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना, स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन आदी संघटनांचे 300 च्यावर युवक सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com