Navi Mumbai एअरपोर्टला मिळणार रेल्वे कनेक्टिव्हिटी; रेल्वे, विमान वाहतूक मंत्रालयाचा उपक्रम

Navi Mumbai International Airport
Navi Mumbai International AirportTendernama

मुंबई (Mumbai) : देशात नव्याने तयार होत असलेली ३ विमानतळे रेल्वेने जोडण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. यात महाराष्ट्रातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही समावेश आहे. योजनेअंतर्गत नवी मुंबई प्रकल्पाला प्राधान्य देण्यात आले असून त्यासाठी जागेच्या सर्वेक्षणाला रेल्वेने मान्यता दिली आहे.

Navi Mumbai International Airport
मुंबईतील सफाई कामगारांच्या वसाहतींचा कायापालट करणार; CM Eknath Shinde

प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेअंतर्गत नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय एकत्रित या योजनेवर काम करीत आहे. नवी मुंबई, नोएडा आणि धोलेरा या तीन महत्त्वाच्या बांधकामाधीन विमानतळांना रेल्वे कनेक्टिव्हिटीने जोडण्यात येणार आहे. नवी मुंबई विमानतळाला रेल्वेने जोडण्यासाठी डिसेंबर 2024 पर्यंत रेल्वे स्टेशन बांधणे, ट्रॅक टाकणे ही कामे केली जाणार आहे. यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव गेल्या काही महिन्यांपासून एकत्रित काम करीत आहेत. 8 मे रोजी ज्योतिरादित्य शिंदे यांनी वैष्णव यांना पत्र लिहून तीन विमानतळांना रेल्वेने जोडण्याची विनंती केली होती. यासाठी 10 जुलै रोजी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली आहे.

Navi Mumbai International Airport
Mumbai : 13 हजार कोटींच्या 'त्या' टेंडरला दसऱ्याचा मुहूर्त?

विमानतळाच्या प्रकल्प अहवालानुसार रेल्वे मंत्रालय रेल्वे प्रकल्पाचा कालबद्ध कार्यक्रम ठरवणार आहे, तसेच या कार्यक्रमाच्या माहितीची दोन्ही खात्यांमध्ये देवाणघेवाण केली जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. गेल्या महिन्यात, ज्योतिरादित्य शिंदे यांनी वैष्णव यांना आणखी एक पत्र लिहून प्रकल्पाबाबत पाठपुरावा करण्याची विनंती केली होती. तिन्ही विमानतळांमध्ये नवी मुंबई विमानतळ हे अत्यंत महत्वाचे आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दरवर्षी 9 कोटी प्रवासी ये जा करतील. हे विमानतळ डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्धिष्ट आहे. त्यामुळे हे विमानतळ लवकरात लवकर रेल्वे वाहतुकीशी जोडणे गरजेचे आहे. विमानतळ उभारण्यापूर्वी त्याच्या खाली रेल्वे स्थानक बांधणे आवश्यक आहे, असेही ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे. योजनेअंतर्गत नवी मुंबई प्रकल्पाला प्राधान्य देण्यात आले असून त्यासाठीच्या जागेच्या सर्वेक्षणाला रेल्वेने परवानगी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com