Bhandara : उद्योगपतींना श्रीमंत करणारा 'हा' तालुका दारिद्र्यात का खितपत पडलाय?

Tumsar
TumsarTendernama

भंडारा (Bhandara) : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुका धानाचे कोठार म्हणून राज्यभर सुपरिचित आहे. राज्याच्या अखेरच्या टोकावर वसलेला हा तालुका असून, भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक संपन्नता वाट्याला आलेला; परंतु विकासासाठी तरसणारा ठरला आहे.

ब्रिटिशकालीन जगप्रसिद्ध दोन मॅग्निज खाणी आहेत. जगात हॉलंडनंतर दुसऱ्या क्रमांकाच्या या मॅग्निज खाणी असल्याची नोंद केंद्र सरकारकडे असून, मॅग्निज खाण परिसरात मागील सात दशकांपासून एकही उद्योग स्थापन करण्यात आला नाही. उद्योगपतींना श्रीमंत करणारा हा परिसर मात्र दारिद्र्यात खितपत पडला आहे.

Tumsar
Konkan Expressway : मुंबई-गोवा हायवे आता विसरा; MSRDC देणार सुसाट प्रवासाचे 2 नवे पर्याय

तुमसर तालुक्याच्या सीमेत भूमिगत आणि खुल्या मॅग्निज खाणी ही लाभलेली श्रीमंत देण आहे. परंतु मागील सात दशकांपासून मॅग्निजवर आधारित या तालुक्यात एकही उद्योग केंद्र किंवा राज्य सरकारने स्थापन करण्याचा प्रयत्न केला नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. ब्रिटिशांनी या मॅग्निज खाणींचा शोध लावला होता. या खाणीवर ब्रिटिशांचे भारत स्वतंत्र झाल्यानंतरही 1970 पर्यंत या खाणी ब्रिटिशांच्या वर्चस्वात होत्या.

खाण परिसरात बेरोजगारी : 

केंद्र सरकारच्या अखत्यारीत या दोन्ही मॅग्निज खाणी असून, या परिसरात बेरोजगारी फोफावली आहे. हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त असल्याने परिसरात शेतीही कमीच आहे. आदिवासी बहुल ही 40 ते 42 गावे येतात. त्या गावातील तरुणांच्या हाताला काम मिळाले नाही. अनेक तरुणांनी शहराकडे रोजगाराकरिता पलायन केले आहे. शेवटपर्यंत ब्रिटिशांना या खाणींचा मोह सुटत नव्हता.

Tumsar
Thane : तासाचा प्रवास पाच मिनिटात; 'त्या' 4.47 किमी खाडीपुलासाठी MMRDAचे टेंडर

कोट्यवधींचा महसूल

केंद्र सरकारला या दोन्ही मॅग्निज खाणीपासून दरवर्षी कोट्यवधींच्या महसूल प्राप्त होतो. मॅग्निज ओर इंडिया लिमिटेड या केंद्र सरकारच्या उपक्रमाला कोट्यवधींचा नफा या दोन्ही खाणीपासून सातत्याने मिळत आहे. परंतु हा संपूर्ण परिसर मात्र दारिद्र्यात अजूनही खितपत पडला आहे. मूलभूत सुविधांचा अभाव या खाण परिसरातील गावांमध्ये आजही दिसून येतो.

Tumsar
Thane : तासाचा प्रवास पाच मिनिटात; 'त्या' 4.47 किमी खाडीपुलासाठी MMRDAचे टेंडर

उद्योग स्थापन करावा :

कौशल्य विकास कार्यक्रम व स्किल इंडिया या उपक्रमांचा मोठा गाजावाजा केला जात आहे. जगप्रसिद्ध खाण परिसरात मॅग्निजवर आधारित मोठा उद्योग येथे स्थापन करण्याकरिता अजूनपर्यंत प्रयत्न करण्यात आले नाही, ही खरी शोकांतिका आहे. जगातील अनेक देशांत कच्चा माल जिथे मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. तिथे उद्योग स्थापित करण्यात आले. तुमसर तालुक्यातील खाण परिसर हे त्याला अपवाद ठरले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com