Amravati : अमरावतीकरांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारकडून 'ही' मागणी पूर्ण; लवकरच...

E Bus
E BusTendernama

अमरावती (Amravati) : अमरावती महानगरातील रस्त्यांवर येत्या काही महिन्यांतच ई- बसेस धावणार आहेत. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शहरी व आवासन मंत्रालयाने 50 बस मंजूर केल्या असून, सार्वजनिक वाहतुकीसाठी त्या सज्ज असतील. मेट्रो पॉलिटिन शहराच्या धर्तीवर आता अमरावतीत सुद्धा पर्यावरण समृद्धीच्या दिशेने एक पाऊल पुढे वाटचाल सुरू झाल्याचे चित्र आहे.

E Bus
Nashik : केंद्राच्या 100 ई-बसचा डेपो होणार आडगावला

विदर्भात नागपूर नंतर अमरावती शहरात ई-बसेस धावणार आहेत. अगोदरच्या शहर बसचे आयुर्मान जवळपास संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनाने केंद्र शासनाकडे ई-बसेस मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. केंद्र शासनाचे राष्ट्रीय शहरी व आवासन मंत्रालयाच्या 1 सप्टेंबर 2023 रोजीच्या पत्रान्वये देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या बसेसमध्ये इलेक्ट्रिक बसेसचा वाटा वाढविण्यात आला आहे.

याच हेतूने केंद्र शासनाने पीएम ई-बससेवा योजना सुरु केली असून, त्यामध्ये प्रथम टप्प्यात अमरावती महानगरपालिकेचा समावेश करण्यात आला आहे. या अमरावती शहरातील नागरिकांना नवीन ई-बससेवेद्वारे पर्यावरणपूरक सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे.

E Bus
Nashik : 2055 पर्यंतचा पाणीप्रश्न सोडवणाऱ्या जलवाहिनीचे टेंडर प्रसिद्ध

केंद्र शासनाच्या निधीतून सुसज्ज चार्जिंग स्टेशन

केंद्र शासनाद्वारे एकूण 50 ई-बसेस अमरावती महापालिकेला प्राप्त होणार आहेत. त्यासाठी आवश्यक बस डेपो चार्जिंग स्टेशनसह विकसित करण्यासाठी केंद्र शासन द्वारे निधी प्राप्त होणार आहे. त्याअनुषंगाने महापालिका प्रशासनाला केंद्र शासनाकडे सविस्तर अहवाल पाठवावा लागणार आहे.

बदलत्या काळानुसार सार्वजनिक वाहतूक सुविधांमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. त्यानुसार केंद्र शासनाकडे ई-बसेसची मागणी करण्यात आली होती. ती मंजूर झाली असून, लवकरच या अद्ययावत ई- बसेस अमरावती शहराच्या रस्त्यावर धावतील. ही नागरिकांसाठी मोठी उपलब्धी ठरणारी आहे. अशी माहिती महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com