
अमरावती (Amravati) : तीन वर्षांपूर्वी जुना बायपास मार्गावर रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. मात्र, प्रशासनातील विविध विभागांच्या असमन्वयामुळे आतापर्यंत हे काम अर्ध्यावरच येऊन ठेपले. कासवगतीने सुरू असलेल्या कामामुळे वाहनचालकांना प्रचंड धोका व मनस्ताप झेलावा लागत आहे. भूधारकांचा प्रश्नदेखील पुढे सरकलेला नाही.
जुना बायपास मार्गावर अमरावती ते बडनेरा रेल्वे उंच फाटकाच्या ठिकाणी जवळपास तीन वर्षांपूर्वी उड्डाणपुलाचे काम उभ सुरू झाले. हा मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. एमआयडीसी, अमरावती, कोंडेश्वर, एक्स्प्रेस मा हायवे, तसेच विविध महाविद्यालये, गावखेड्यांकडे जाणारा हा मार्ग आहे. या मार्गावर जन् प्रचंड वाहतूक असते. रेल्वे क्रॉसिंगपासून एकाच भागाचे काम झाले आहे. तब्बल आठ महिन्यांपूर्वी रेल्वे रुळाच्या काही उंचीवर अत्याधुनिक यंत्रांच्या माध्यमातून लोखंडी गर्डर उभारण्यात आले. काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. उड्डाणपुलाच्या खालून जाणारा मार्ग पावसामुळे धोक्याचा ठरत आहे. वाहन चालकांना जीव धोक्यात घालूनच आवे लागते. जवळपास 23 भूधारकांची मागणी अद्यापही मार्गी लागलेली नाही.
अजून किती वर्ष लागणार?
उड्डाणपुलाचे रेल्वे पटरीपासून एका बाजूचे काम झाले. दुसऱ्या बाजूने अद्यापही बरेच काम होणे बाकी आहे. आतापर्यंत जवळपास तीन वर्षाहून अधिक कालावधी लागला आहे. या संपूर्ण कामाला अजून किती वर्षे लागणार, असा प्रश्न शहरवासीयांसह वाहनचालकांना पडला आहे. वर्दळीमुळे या कामाला प्रशासनाने तत्काळ पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी व कामगारांना मोठा मनस्ताप झेलावा लागतो आहे.