नाशिक मनपाचा खड्डे बुजविण्याचा 'हा' प्रयोग तरी यशस्वी होणार का?

Nashik Municipal Corporation.
Nashik Municipal Corporation.Tendernama

नाशिक (Nashik) : पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांवर पावसाळा संपण्यापूर्वी कायमस्वरूपी इलाज करता येत नसल्यामुळे महापालिकेने (Nashik Municipal Corporation) भर पावसात रस्त्यांवरील खड्ड्यांत पेव्हरब्लॉक (Paver Block) बसविण्याचा प्रयोग फसल्यानंतर आता डांबरी रस्त्यावर काँक्रिटचे अस्तर केले जात आहे.

Nashik Municipal Corporation.
गंगापूर धरणातून सातपूरसाठी 200 कोटीची थेट पाईपलाईन; आता पाणीपुरवठा

नाशिक शहरात सात जुलैपासून सुरू झालेल्या पावसाने सर्व रस्त्यांची धूळधाण उडवली. रस्त्यांवर पदोपदी खड्डे झाल्याने महापालिकेने 27 जुलैपासून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. मात्र, पाऊस सुरूच असल्याने डांबर टाकून खड्डे बुजवणे शक्य नव्हते. यामुळे खड्ड्यांची खोली अधिक असेल तेथे पेव्हरब्लॉक बसवण्याचे प्रयोग करण्यात आले. लहान खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्याचे ठरले. त्यानुसार भर पावसात पेव्हरब्लॉक बसवणे व खड्यांमध्ये मुरूम टाकण्यातचे काम सुरू झाले. पाऊस सातत्याने सुरू राहिल्यामुळे मुरूम वाहून गेला व पेव्हरब्लॉक तसेच राहून त्याच्या आजूबाजूला खड्डे पडले.

Nashik Municipal Corporation.
अखेर नागपूर विद्यापीठाला आली जाग; ‘एमकेसीएल’चे टेंडर रद्द

महापालिकेने शहरातील खड्डे मोजून हे साडे सहा हजार खड्डे बुजवण्यासाठी 27 कोटींची तरतूद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शहरात मागील दोन वर्षांत 600 कोटींचे रस्ते तयार करण्यात आले असून त्यांची देखभाल घेण्याची ठेकेदारांवर तीन वर्षांची जबाबदारी आहे. यामुळे या रस्त्यांवर महापालिकेने खर्च करण्यास लोकप्रतिनिधींनी विरोध केला. नागरिकांकडून खड्डयांबाबत ओरड वाढल्याने महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ठेकेदारांना गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत, अन्यथा त्यांना काळ्या टाकण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

Nashik Municipal Corporation.
अखेर जालन्याच्या 'साई'ला महापालिका प्रशासकांचा दणका

त्यानुसार पाऊस उघडल्यानंतर शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्यास ठेकेदारांनी अनेक ठिकाणी सुरुवात केली आहे. मात्र, पाऊस उघडल्यानंतर रस्त्यांवरील चिखल सुकला असून त्याचे धुळीत रूपांतर झाले आहे. वाहनांच्या वेगामुळे धुळीचे लोट उडत असून धूळ डोळ्यात जाऊन दुचाकीस्वार त्रस्त झाले आहेत. ही उडणारी धूळ वाहनांवर बसत असल्याने चारचाकीधारकही त्रस्त झाले आहेत. दरम्यान पावसाळा संपला नसल्यामुळे हे खड्डे बुजवण्यासाठी डांबर वापरल्यास पाऊस आल्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती होईल, या काळजीने महापालिकेच्या बांधकाम विभागाने काँक्रिटीकरणाने अस्तरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात उंच व उतार असलेल्या भागात डांबराने खड्डे बुजवले जात असून सखल व पावसाचे पाणी साचणाऱ्या भागात काँक्रिटचे अस्तर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक शहरातील काही रस्त्यांवर काँक्रिटचे अस्तरीकरण केले जात आहे. डांबराच्या रस्त्यावर सिमेंटचे अस्तर बघून लोक अचंबित होत आहेत. मात्र, महापालिकेच्या बांधकाम विभागासमोर दुसरा पर्याय नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत हे प्रयोग केले जात आहेत.

Nashik Municipal Corporation.
500 कोटींच्या नाशिक ड्रायपोर्टचा मार्ग मोकळा; हजारो रोजगार संधी

वाहतूककोंडी

शहरातील प्रमुख व अधिक वर्दळ असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास सुरवात झाली आहे. नाशिक पुणे महामार्गावरील द्वारका चौक ते नाशिकरोड या दरम्यान खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com