Nashik-Pune मार्गावरील 'या' टोलनाक्यावर सहा महिन्यांत पुन्हा दरवाढ

Khed Shivapur Toll
Khed Shivapur TollTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावाजवळ टोलनाक्याच्या दरात राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणने दहा महिन्यांमध्ये टोलच्या दरात वाढ केली आहे. नवीन दरानुसार कार, जीप, व्हॅन आणि एमएमव्ही वाहनांना या टोलनाक्यावरून जाण्यासाठी पाच रुपये अधिक मोजाव लागणार आहे. टोल द्यावा लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी १५ एप्रिल मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यानुसार २० किमी परिघात वास्तव्यास असलेल्या मासिक पास दरातही वाढ झाली असून स्थानिकांना ३१५ ऐवजी ३३० रुपये मोजावे लागणार आहेत.

Khed Shivapur Toll
Mumbai : 'या' जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी 350 कोटींचे टेंडर

नाशिक महापालिका हद्दीपासून केवळ पाच किलोमीटर अंतरवर नाशिक पुणे महामार्ग क्रमांक ६० वर शिंदे येथे टोलप्लाझा आहे. या महामार्गावर सिन्नर ते नाशिक या भागातील मार्गाचे बांधा, वापरा,हस्तांतरीत करा, या योजनेतून चौपदरीकरण झाल्यानंतर १० नोव्हेंबर २०१७ पासून या मार्गावर वाहनांना टोल आकारणी लागू झाली आहे. टोल प्लाझापासून २० किलोमीटर परिघातील रहिवाशांना स्थानिक सवलतीचा लाभ दिला जातो. या टोलप्लाझापासूनच्या २० किलोमीटरच्या परिघात जवळपास निम्मे नाशिक शहर येते. मात्र, स्थानिक नागरिकांना असलेली सवलत केवळ नाशिकरोड भागातील रहिवाशांना दिली जाते. यावरून बरेचदा वाद व आंदोलन झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभाग व सिन्नर-नाशिक टोल वेज लिमिटेड या कंपनीमध्ये २ मार्च २०१६ ला झालेल्या करारानुसार ही ही टोल आकारणी केली जाते व दरवर्षी टोलकरामध्ये वाढ जाहीर केली जाते.

Khed Shivapur Toll
Nashik ZP : 2538 पदांची लवकरच आयबीपीएसच्या माध्यमातून भरती

नवीन दरवाढीनुसार २४ तासांचा आत परतीच्या प्रवासाठी देखील पाच रुपयांची वाढ झालेली आहे. कार, जीप, व्हॅन या वाहनांना परतीच्या प्रवासासाठी ६० रुपयांचा टोल आकारला जात होता. आता हा टोल ६५ रुपये झाला आहे. अन्य वाहनांना देखील याप्रमाणात वाढ करण्यात आली आहे. बस, ट्रक २ एक्सेल वाहनांना २४ तासात परतीसाठी २१० रुपये  टोल लागत होता आता हा टोल २२० रुपये असेल. महामार्ग प्राधिकरणणे यापूर्वी १५ ऑक्टोबर २०२२ रोजी शिंदे टोलनाक्यावरील टोलदरामध्ये वाढ केली होती. त्यानंतर सहा महिन्यांमध्ये पुन्हा दरवाढ करून वाहनधारकांन दणका दिला आहे. प्रत्येक सहा महिन्यांनी केली जाणारी दरवाढ वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Khed Shivapur Toll
Nashik : सिटीलिंक बससेवेच्या कर्मचाऱ्यांना संप करण्यावर बंदी?

नवीन टोलदर
वाहनांचा प्रकार                          नवीन दर                   जुने दर
कार, जीप, व्हॅन, एलएमव्ही             ४५                       ४०
एलसीव्ही, एजजीव्ही, मिनीबस         ७०                         ६५
बस / टक २ एक्सेल                     १४५                       १४०    
३ एक्सेल कर्मिशिअल वाहने           १६०                          १५०  
चार ते सहा ॲक्सेल                   २३०                         २१५    
अवजड वाहन                         २८०                         २६५

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com