Nashik Kumbh Mela: आधी प्रलंबित 300 कोटी द्या, तरच साधुग्रामबाबत चर्चा!

प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांची भूमिका; प्रशासन काय निर्णय घेणार?
सिंहस्थ कुंभमेळा नाशिक
simhastha maha Kumbh Nashik, sadhugramTendernama
Published on

नाशिक (Nashik): महापालिकेच्या अनेक प्रकल्पांना पंचवटीतील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या असून त्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. महापालिकेतने तातडीने प्रलंबित अडीचशे ते तीनशे कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांना द्यावी. त्यानंतरच विस्तारित साधुग्रामसाठी भाडेतत्वावर जमिनींबाबत चर्चा करू. तसेच या भाडेत्त्वावर घेतल्या जाणाऱ्या जमिनीसंदर्भात महापालिकेने लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सिंहस्थ कुंभमेळा नाशिक
Sadhugram Nashik: शेतकऱ्यांचा अल्टिमेटम! 15 दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा साधुग्रामसाठी जमिनी देणार नाही

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर साधुग्रामसाठी आवश्यक जमिनीच्या अधिग्रहण प्रक्रियेतील अडचणी सोडवण्यासाठी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली  महापौर दालनात शेतकऱ्यांसोबत बैठक झाली. यावेळी महापौरांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

सिंहस्थ कुंभमेळा वर्षभरावर येऊन ठेपला असून अद्याप साधुग्रामसाठी कायमस्वरुपी भूसंपादन व भाडेतत्वावर जमिनी देण्याबाबत काहीही निर्णय झालेला नाही. साधुग्रामसाठी जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन महिनाभरात साधुग्रामसाठी आवश्यक असलेल्या जमिनींबाबत निर्णय घ्या, अन्यथा शेतकरी जमिनी देणार नाहीत, अशी भूमिका जाहीर केली होती.  

त्यावर कुंभमेळा आयक्तांना महापालिकेसोबत चर्चा करण्यास सांगितले होते. त्यानंतर महिनाभराने महापौर दालनात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी सेल इंडेक्सच्या प्रमाणात जमिनीचा दर निश्चित करण्याची मागणी केली. प्रशासनाने यावर सकारात्मक भूमिका घेत पुढील कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले.

सिंहस्थ कुंभमेळा नाशिक
Nashik Chennai Highway: नाशिक-चेन्नई महामार्गाच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी का पुकारला एल्गार?

महापौरांनी शेतकऱ्यांसमोर उर्वरित ७०० एकर जमीन भाडेतत्वावर घेण्याचा पर्याय ठेवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून शिखर समितीकडे प्रस्ताव पाठवण्याचे आश्‍वासन दिले. दरम्यान, शेतकऱ्यांनी २५०-३०० कोटींची प्रलंबित देयके द्यावी, तसेच रेडीरेकनरच्या दुप्पट म्हणजे ९० हजार रुपये चौरस मीटर भाव देण्याची मागणी केली.

नगरसेवक गुरमित बग्गा यांनी महापालिका किती पैसे देणार याची माहिती देण्याची मागणी केली. उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, भाजप गटनेते ॲड. श्याम बडोदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या सीमा ठाकरे, नगरसेवक सुरेश पाटील, अजय बोरस्ते, गुरमीत बग्गा, गौरव गोवर्धने, प्रियांका माने, रिद्धीस निमसे, नामदेव शिंदे, जुई शिंदे, इंदूबाई खेताडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शेतकरी संघर्ष कृती समितीचे समाधान जेजुरकर, जयवंत जेजुरकर आदी उपस्थित होते.

सिंहस्थ कुंभमेळा नाशिक
Nashik Ring Road: पहिली डील पूर्ण, 33 गुंठ्यांसाठी ₹3.19 कोटींची भरपाई

दरम्यान शेतकऱ्यांनी यापूर्वी मलनि:स्सारण केंद्रे, अंतर्गत रिंगरोड, नांदूर-नाशिक शिव रस्ता, जत्रा रोड या कामांसाठी जमिनी दिल्या आहेत. त्या जमिनींची शेतकऱ्यांचे देयके प्रलंबित आहेत. त्यातील साडेबारा कोटी रुपये न्यायालयाकडे वितरित करण्यासाठी पाठविले जाणार आहेत. या निधीवरील स्थगिती येत्या महिनाभरात उठवून संबंधित शेतकऱ्यांना रक्कम देण्याचे आश्‍वासन महापौरांनी दिले.

सिंहस्थ कुंभमेळ्यात शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्यासाठी बैठक आयोजित केली, त्यांच्या सर्व समस्यांचे तातडीने व न्याय्य निराकरण करण्याचा प्रयत्न करू. असे आश्वासन महापौर यांनी दिले.

सिंहस्थ कुंभमेळा नाशिक
Nashik: द्वारका चौकातील सर्व प्रकारची वाहतूक आणखी 3 महिने बंद राहणार

साधुग्राम दृष्टीपथात

साधूग्रामसाठी आवश्यक जमीनः ३७७ एकर
आतापर्यंत अधिग्रहनः ९४ एकर
अधिग्रहना बाकीः २८३ एकर
अतिरिक्त भूसंपादन प्रस्तावः १९२ एकर

Tendernama
www.tendernama.com