Nashik : जलजीवनमधील 81 पाणीपुरवठा योजनांची कामे दर्जाहिन; आता नव्याने...

Nashik ZP
Nashik ZPTendernama

नाशिक (Nashik) : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा अंतर्गत सुरू असलेल्या १२२२ पाणी पुरवठा योजनांपैकी जवळपास ११८६ योजनांची कामे सुरू आहेत. या योजनांची कामे सुरू होऊन जवळपास वर्ष होत आले आहे. या सुरू असलेल्या कामांपैकी ८१ कामांच्या दर्जाबाबत जिल्हा परिषदेकहे गंभीर आक्षेप आले आहेत. सध्या या कामांवरील आक्षेप दूर करण्याचे काम सुरू आहे.

Nashik ZP
Nashik : अजित पवारांच्या सूचना अन् नाशिक-पुणे हायस्पीडच्या भूसंपादनाला येणार वेग

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक घराला शुद्ध पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेतून नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून १२२२ योजनांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. या योजनेतील कामांच्या दर्जाबाबत पहिल्यापासून तक्रारी आहेत. यामुळे विभागाने ॲप तयार केले असून प्रत्येक कामाबाबतचे फोटो, व्हिडिओ त्या ॲपवर अपलोड केल्याशिवाय ठेकेदारांची देयके न देण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने देयकांची फाईल सादर केल्यानंतर त्रयस्थ संस्थेच्या अहवालानुसारच देयके देण्याची भूमिका घेतली आहे. याविरोधात ठेकेदारांनी बरीच ओरड करूनही मुख्य कार्यकारी अधिकार अशिमा मित्तल आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या आहेत.

Nashik ZP
Nashik : सिंहस्थाच्या निमित्ताने तीन हजार कोटींचे रस्ते प्रस्तावित

या शिवाय त्रयस्थ संस्थेने तपासणी अहवालात ५० टक्के काम झाल्याचे नमूद केले असले, तरी प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी रकमेचे देयक मंजूर केले जाते. दरम्यान या सुरू असलेल्या कामांपैकी ८१ योजनांची कामे अत्यंत सुमार दर्जाचे झाले असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर झाला आहे. या अहवालानुसार पाणी पुरवठा योजनांची ही कामे करताना ठेकेदारांनी ठरलेल्या निकषांचे पालन केले नाही. तसेच अधिकारी वर्गाने दिलेल्या सूचनांचेही पालन केले नसल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने जलवाहिनीच्या चरांची खोली पुरेशी नसणे, जलकुंभाचे काम नियमाप्रमाणे न करणे, विहिरींची खोली ठरल्यापेक्षा कमी घेणे, जलकुंभाचे कॉलमचा दर्जा सुमार असणे, कामांचे फिनिशिंग व्यवस्थित न करणे, स्वीचरुमचे बांधकाम नियमाप्रमाणे न करणे आदी बाबींमुळे त्रयस्थ संस्थेने या ८१ कामांचे पुनर्बांधकाम करण्याबाबतचा अहवाल दिला असल्याचे समजते. या अहवालानंतर काही ठेकेदारांनी त्यांच्या कामांमध्ये सुधारणा करण्यास सुरवात केली असल्याचेही समजते. मात्र,बहुतांश कामे अद्यापही तशीच पडून आहेत. ही कामे या त्रुटींसह पूर्ण झाल्यास त्या योजनेवरील लाभार्थ्यांना पाणी मिळू शकणार नाही. यामुळे या कामांची देयके मंजूर झाली नसल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com