NIMA: उद्योगमंत्री उदय सामंत नाशिककरांना 'ती' गोड बातमी देणार का?

Uday Samant
Uday SamantTendernama

नाशिक (Nashik) : केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मंजूर केलेले इलेक्ट्रॉनिक-इलेक्ट्रिकल क्लस्टर (Electronic - Electric Cluster) उभारताना नाशिकचा प्राधान्याने विचार व्हावा, अशी आग्रही मागणी नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (NIMA) अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याकडे प्रत्यक्ष भेटीवेळी केली. त्यावर उद्योगमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नाशिकला क्लस्टर होण्याचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे आहेत.

Uday Samant
देशात नागपूरचाच वाजणार डंका! ...असे का म्हणाले Devendra Fadnavis?

निमा पॉवर एक्झिबिशनच्या माध्यमातून या क्लस्टरला मूर्त स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी निमा प्रयत्नशील आहे. या क्षेत्रासाठी मोठी गुंतवणूक आणण्यासाठी महाराष्ट्र शासनानेही प्रयत्न करावेत, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. तसेच, निमा पॉवर एक्झिबिशनच्या उद्‌घाटनासाठी येण्याचे निमंत्रणही शिष्टमंडळाने त्यांना दिले. त्यावरही सामंत यांनी तातडीने होकार दिला.

Uday Samant
Mumbai: फडणवीसांच्या प्रयत्नांना यश! अखेर 'तो' आदेश मागे

राज्याचे विकास आयुक्त दिपेंद्रसिंग कुशवाह, सहआयुक्त डी. एस. कोर्बू, निमाचे सचिव राजेंद्र अहिरे, निमा पॉवरचे चेअरमन मिलिंद राजपूत, विजय जोशी, विराज गडकरी, राजेंद्र वडनेरे, आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे यांच्यासह एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, जयंत बोरसे, संदीप पाटील आदींसह प्रशासकीय अधिकारी व उद्योजक या वेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com