Nashik: E-Charging स्टेशन्ससाठी महापालिकेने का काढले फेरटेंडर?

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने शहरात २० ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन पुरवठा, उभारणी, स्थापना व कार्यान्वित करण्यासाठी फेर ई- टेंडर प्रसिद्ध केले आहे. या टेंडरमध्ये सहभागी होण्यासाठी संबंधित मुक्तेदार कंपन्यांना १४ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या २० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी महापालिकेने १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे.

Nashik Municipal Corporation
तिसऱ्या रेल्वेलाईनमुळे नांदगावची 3 भागात विभागणी;नागरिकांचे आंदोलन

महापालिकेने यापूर्वी बोलावलेल्या टेंडरमध्ये सहभागी झालेल्या नामांकित कंपन्यांनी टेंडरमधून माघार घेतल्यानंतर इतर सात कंपन्या सहभागी झाल्या होत्या. मात्र, या सर्व सहभागी कंपन्यांची कागदपत्र अपूर्ण असल्याने त्या अपात्र ठरल्या. यामुळे ती टेंडर प्रक्रिया रद्द करून विद्युत विभागाकडून फेरटेंडर प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) धोरण अंतर्गत नाशिक महापालिकेतर्फे शहरात १०६ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. त्यापैकी नॅशनल क्लीन एअर पॉलिसी (एन कॅप) अंतर्गत ३५ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यातील २० चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी मेमध्ये राबवलेल्या टेंडर प्रक्रियेला मुदतवाढ दिल्यानंतर टाटा, रिलायन्स सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी माघार घेतली व त्याऐवजी इतर सात कंपन्यांनी सहभागा घेतला होता.

Nashik Municipal Corporation
दशकांची कोंडी फुटणार; शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी पाडापाडी सुरू

दरम्यान, या टेंडरचा तांत्रिक लिफाफा उघडल्यानंतर कागदपत्रांची तपासणी केली. यात तांत्रिक तपासणीत सर्व कंपन्या अपात्र ठरल्या. त्यामुळे टेंडर रद्द करण्यात आले. या नवीन फेरटेंडरमधील अटीशर्तींनुसार टेंडर मिळालेल्या कंपनीवर तीन वर्षांसाठी चार्जिंग स्टेशनच्या ऑपरेशन आणि देखभालीची जबाबदारी असणार आहे.

टेंडरमध्ये सहभागी होण्याची मुदत १४ ऑगस्टपर्यंत असून तांत्रिक लिफाफा १७ ऑगस्टला उघडला जाणार आहे. तत्पूर्वी ७ ऑगस्टला टेंडरपूर्व बैठक बोलावण्यात येणार आहे. टेंडरमध्ये दिल्यानुसार कार्यादेश दिल्यनंतर चार महिन्याच्या आत चार्जिंग स्टेशनची उभारणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.  चार्जिंग स्टेशन येथे चारचाकी वाहनांसाठी ६० केव्ही व दुचाकी, तीनचाकी वाहनांसाठी ३.३ केव्ही क्षमतेचे चार्जर बसवण्यात येणार आहेत. 

Nashik Municipal Corporation
तगादा : देखभालीच्या वादातून नाशिक बसस्टॅण्डची दुरावस्था

या ठिकाणी होणार चार्जिंग स्टेशन्स

राजीव गांधी भवन,पश्‍चिम विभागीय कार्यालय, पूर्व विभागीय कार्यालय, नाशिकरोड विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय, पंचवटी विभागीय कार्यालय, सिडको विभागीय कार्यालय, तपोवन बस डेपो, अमरधाम फायर स्टेशन पंचवटी, सातपूर फायर स्टेशन, राजे संभाजी स्टेडियम सिडको, बिटको हॉस्पिटल, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, बी.डी. भालेकर मैदान, प्रमोद महाजन उद्यान, महात्मा नगर क्रिकेट मैदान, दादासाहेब फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी बाजार इमारत, लेखानगर महापालिका जागा, अंबडलिंक रोडवरील महापालिका मैदान या २० ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारले जाणार असून या ठिकाणी चारचाकी वाहनांच्या बॅटरी चार्जिंग करण्यासाठी प्रत्येक एक व दोन-तीन चाकी वाहनांच्या बॅटरी चार्जिंग करण्यासाठी प्रत्येकी पाच स्टेशन्स उभारले जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com