Nashik : माळेगाव एमआयडीसीतील उद्योजक का झाले आक्रमक?

MIDC
MIDCTendernama

नाशिक (Nashik) : सिन्नरच्या माळेगाव औद्योगिक वसाहमतीमध्ये नव्याने डांबरीकरण केलेला तीन किलोमीटरचा रस्ता निकृष्ट कामामुळे गाजत आहे. उद्योजकांच्या तक्रारी तसेच आ. माणिकराव कोकाटे यांनी कामाची चौकशी करण्याच्या व रस्ता नव्याने करण्याच्या सूचना देऊनही एमआयडीसीचे अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. यामुळे अखेर सिन्नर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (सिमा) उद्योजकांनी साखळी उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

MIDC
Vijay Wadettiwar : कंत्राटी भरती करणाऱ्या कंपन्यांवर 8 हजार कोटींची मेहेरनजर

सिन्नरच्या माळेगाव औद्योगिक वसाहतीत १२०० पेक्षा अधिक उद्योग असून या वसाहतीत एकच मुख्य रस्ता आहे. यावरून सातत्याने होत असलेल्या वाहतुकीमुळे या रस्त्याची दुरवस्था झाल्याने उद्योजकांनी त्यांच्या दुरुस्तीची एमआयडीसीकडे मागणी केली होती. उद्योगमंत्र्यांसोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीतही उद्योजकांनी या रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न उपस्थित केला होता. परिणामी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने माळेगाव एमआयडीसीतील या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी तीन कोटी रुपये निधी मंजूर केला.

या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकदाराने अत्यंत संथगतीने काम केल्याने काम सुरू असतानाचा उद्योजकांच्या या कामाबद्दल तक्रारी होत्या.

MIDC
Nashik : पाच कोटींची पाणीचोरी पकडण्यासाठी स्कॉड; दिवाळीनंतर होणार कारवाई

दरम्यान या डांबरीकरणाच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने तक्रारीत वाढ झाली. या तक्रारींची दखल घेऊन एमआयडीसीच्या बांधकाम विभागाने दर्जा सुधारण्याचे आश्वासन देऊनही फारशी सुधारणा झाली नाही. यामुळे उद्योजकांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यामुळे रस्त्याचे काम १५ दिवसांत मार्गी लावावे, कामाचा दर्जा तपासावा, गरज पडल्यास ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे तसेच देयके अदा करू नये, अशा सूचना कोकाटे  यांनी एमआयडीसी अधिकारी नितीन गवळी, कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे व यांना आढावा बैठकीत केल्या होत्या.

त्यानंतरही या रस्त्याच्या कामात काहीही सुधारण होत नसल्याचे बघून उद्योजकांच्या संघटनेने एमआडीसीला निवेदन दिले असून या रस्त्याची दिवाळीच्या सुटीत दर्जेदार दुरुस्ती करावी. या रस्त्याचे काम २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण न झाल्यास एमआयडीसी कार्यालयात  साखळी उपोषण करण्याचा इशारा सीमा संघटनेने दिला आहे. याबाबत उपअभियंता मनोज पाटील, सिमाचे स‍ अध्यक्ष किशोर राठी, सचिव बबन वाजे यांनी निवेदन दिले. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com