Nashik: ...असे आहेत नाशिक शहराबाहेरून जाणारे 2 रिंगरोड?

Nashik
NashikTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक - पुणे, मुंबई आग्रा, छत्रपती संभाजीनगर - नाशिक या मार्गावरील वाहतूक गरज नसताना नाशिक शहरात येऊन होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाशिक शहराबाहेरून जाणारे दोन रिंगरोड (Ring Road) महापालिकेने राज्य सरकारकडे प्रस्तावित केले आहेत. यामुळे राज्य सरकारच्या सूचनेनुसार नाशिकरोड येथील नगररचना सहायक संचालक विभागाने नाशिक महापालिकेकडून या दोन्हीही रिंगरोडसाठी किती क्षेत्र बाधित होईल याची शिवारनिहाय माहिती मागवली आहे.

Nashik
7 तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम पूर्ण

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक शहराबाहेरून जाणाऱ्या दोन रिंगरोडचा प्रस्ताव आहे. नाशिक शहरात अवजड वाहनांना थेट प्रवेश न देता बाहेरच्या बाहेरून मुंबई-पुण्याकडे तसेच गुजरात किंवा मध्य प्रदेशकडे जाता यावे या दृष्टिकोनातून दोन रिंगरोडची मागणी पुढे आली आहे. या दोन रिंगरोडसाठी महापालिकेने रेखांकन केले असून, साधारणपणे २६० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. महापालिकेने यापूर्वीच जानेवारीत रिंगरोड बाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.

या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या नाशिकरोड येथील नगररचना कार्यालयाने एक नकाशा तयार करून दोन्ही रिंगरोडचा मार्ग कसा असेल याची माहिती मागवली आहे. साधारणपणे पंधरा दिवसांत ही माहिती पाठविण्यात येईल, अशी माहिती उपसंचालक हर्षल बाविस्कर यांनी दिली.

Nashik
Nashik : 25 इलेक्ट्रिक बस खरेदी अंतिम टप्प्यात; टेंडरची मुदत...

दोन रिंग रोड प्रस्तावित

पाथर्डी फाटा येथील खत प्रकल्पापासून नाशिकरोड, दसक ते आडगाव टर्मिनस असा ६० मीटर रुंद, २६ किमी लांबी व आडगाव ट्रक टर्मिनसपासून म्हसरुळ, मखमलाबाद, चांदशी, अंबड एमआयडीसीमार्गे गरवारे विश्रामगृहापर्यंत ३६ मीटर रुंदीचा व ३० किलोमीटरलांबीचा असे असे दोन रिंगरोड प्रस्तावित आहेत. 

२६० हेक्टर भूसंपादनाची गरज

नाशिक शहराबाहेरून जाणाऱ्या या दोन्ही रिंगरोडसाठी साधारणपणे २६० हेक्टर म्हणजे  २६ लाख चौरस मीटर जागा लागणार आहे. या भूसंपदानाच्या बदल्यात प्रोत्साहनपर टीडीआर देण्याचा विचार झाल्यास एकास तीन यापद्धतीने साधारण ७२ लाख चौरस मीटरचा  टीडीआर द्यावा लागेल असा अंदाज आहे.

Nashik
Nashik ZP : प्रशासक राजवटीत ग्रामीण विकासाकडे दुर्लक्ष, केवळ...

असा आहे ३६ मीटरचा रिंगरोड 

आडगाव ट्रक टर्मिनससमोरून ३६ मीटर रिंगरोडची सुरवात होईल. पुढे आडगाव, म्हसरुळ, मखमलाबाद, मनपा हद्दीबाहेर जलालपूर - बारदान फाटा - गंगापूररोड क्रॉस करून गंगापूर उजवा तट कालवा - सातपूर एमआयडीसीच्या पश्चिम हद्दी- त्र्यंबकरोड-  नंदिनी नदी ओलांडून अंबड एमआयडीसी - गरवारे रेस्ट हाउस- मुंबई- आग्रा महामार्ग

असा आहे ६० मीटरचा रिंगरोड 

मुंबई - आग्रा  महामार्गा - खत प्रकल्प येथून - पाथर्डी  शिवार - पिंपळगाव खांब शिवार - वालदेवी नदी ओलांडून विहितगाव शिवार - नाशिक - पुणे महामार्ग - पंचक - गोदावरी नदी - माडसांगवी शिवार - छत्रपती संभाजीनगररोड ओलांडून आडगाव शिवार-  ट्रक टर्मिनस- मुंबई-आग्रा महामार्ग

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com