Nashik: सिंहस्थातील सर्व कामांचा लेखाजोखा आता फक्त एका क्लिकवर

कामांवर लक्ष ठेवण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा होणार वापर
Kumbh Mela
Kumbh MelaTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणच्या माध्यमातून आगामी सिंहस्थात जवळपास २० हजार कोटींची कामे होणार असून त्यातील दहा हजार कोटींपेक्षा अधिक बांधकामे असणार आहेत. या कामांच्या दर्जावर लक्ष ठेवण्यासाठी प्राधिकरणने प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली (पीएमआयएस) विकसित केली आहे.

Kumbh Mela
Nashik Parikrama Marg: नाशिक शहराच्या रिंगरोडबाबत सरकारकडून दोन मोठे बदल

या प्रणालीच्या माध्यमातून प्राधिकरणच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकल्पांचे नियोजन, देखरेख आणि प्रगती ऑनलाईन पद्धतीने तपासता येणार आहे. यामुळे सर्व कामांचे एकाच ठिकाणी निरीक्षण करून त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

या प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्यानंतर सिंहस्थाच्या विकासकामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणा-या यंत्रणांमधील अधिकारी, कर्मचारी यांना प्राधिकरणकडून प्रशिक्षण देण्यात आले.

सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामार्फत जिल्हापरिषदेच्या सभागृहात प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणालीत डेटा अद्ययावत करण्याबाबत कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षण देण्यात आले.

Kumbh Mela
Mumbai: कल्याण-कर्जत मार्गावरील लोकल वाहतुकीला मिळणार गती

यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर व सर्व यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. आयुक्त सिंह यांनी यावेळी पीएमआयएस प्रणालीबाबत माहिती दिली. या डिजिटल प्रणालीत सर्व यंत्रणांना नवीन माहिती भरणे, वापरकर्ते आणि संस्था जोडणे व जोडलेल्या संस्थांना त्यांच्याशी संबंधित माहिती भरणे शक्य होणार आहे. या प्रणालामध्ये नवीन प्रकल्पांची माहिती भरणे, ती माहिती अद्ययावत करणे, त्यातील कामांची यादी तयार करणे, कामे पूर्ण करण्याच्या तारखा ठरवणे तसेच झालेल्या कामांचे टप्पे व देयकांच्या टप्पे ही माहिती नोंदवता येणार आहे.

याशिवाय प्रकल्प किती टक्के पूर्ण झाला व त्याला टप्प्यानुसार झालेला खर्चही एका क्लिकवर बघता येणार आहे. आणखी महत्वाचे म्हणजे या प्रणालीमध्ये झालेल्या कामांचे छायाचित्र, व्हिडिओ अपलोड करता येणार आहे.

याबरोबरच कोणत्याही प्रकल्पासंदर्भात काही अडचणी असतील तर कार्यान्वयीन यंत्रणेला प्रकल्पासंदर्भातील अडचणी, अडथळे व इतर विभागांकडील प्रलंबित मुद्द्यांची नोंद करता येणार आहे. यामुळे प्राधिकरणमधील संबंधित अधिकारी यांना त्याचे निराकरण करणे सहज शक्य होणार आहे. 

Kumbh Mela
Nashik Airport: सिंहस्थापूर्वी 1000 कोटी खर्चून नाशिक विमानतळाचा होणार कायापालट

नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी सर्व यंत्रणांनी प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली कार्यान्वित करावी, अशा सूचना कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.

त्रयस्थ संस्थाच्यीही नोंदी

सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित विकासकामांची संख्या मोठी असून ती कामे करणा-या कार्यान्वयीन यंत्रणाही अनेक आहेत. यामुळे या कामांच्या दर्जावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक प्रकल्पासाठी बाह्य तपासणी संस्था नेमली जाणार आहे. या त्रयस्थ संस्थानी त्या त्या प्रकल्पांबाबत केलेली निरीक्षणे या प्रणालीत नोंदविता येणार आहे. ही प्रणाली समजण्यास अधिक सुलभ व्हावी व प्रणाली वापराबाबत येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती केली जाणार आहे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com