Nashik: नाशकातील सिडको, सातपूरमध्ये भूमिगत वीजवाहिन्यांचे काम मिशन मोडवर

९२ कोटींचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल सादर
Nashik City, nmc
Nashik City, nmcTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सिडको, कामटवाडा आणि सातपूर परिसरातील उच्चदाबाच्या वीजवाहिन्या भूमिगत करण्यासह वीज वितरण व्यवस्थेशी संबंधित सर्व कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. ज्या ठिकाणी वीजवाहिन्या भूमिगत करणे शक्य नाही, त्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Nashik City, nmc
Nashik Infra News: नाशिकमधील कॉलनी रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी लागणार 1500 कोटी

सिडको व सातपूर परिसरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्याबाबत एमएसआरडीसी कार्यालय, निर्मल भवन, नरिमन पॉईंट येथे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी आमदार सीमा हिरे यांच्यासह महावितरण, महापारेषण, सिडको, नाशिक महानगरपालिका, जिल्हा प्रशासन तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सिडको, सातपूर आणि कामटवाडा परिसरातील अनेक घरांवरून उच्चदाबाच्या वीजवाहिन्या गेल्या आहेत. पावसाळ्यात मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा यामुळे वीजवाहिन्या तुटून अपघात होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या वीजवाहिन्या भूमिगत करण्याची मागणी आमदार सीमा हिरे यांनी केली होती.

महावितरण प्रशासनाने नाशिक शहर विभाग क्र. १ व शहर विभाग क्र. २ अंतर्गत कामटवाडा व सातपूर परिसरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी यापूर्वी ५६.०२ कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला होता. त्यानंतर सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून ९२.७४ कोटी रुपयांचा प्रस्ताव १० ऑगस्ट २०२६ रोजी मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

Nashik City, nmc
कोकणातील 'त्या' 2 तालुक्यांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या टाकणार

बैठकीत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावाही घेण्यात आला. डीपीडीसी योजनेंतर्गत एकूण १४ कामांपैकी ८ कामे पूर्ण झाली असून २ कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरित ४ कामांना दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. ही कामेही तातडीने सुरू करून पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच एडीबी योजनेंतर्गत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात ६ नवीन उपकेंद्रे प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. एडीबी -१ योजना नाशिक ग्रामीण भागासाठी, तर एडीबी -२ योजना नाशिक शहरासाठी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

Nashik City, nmc
Mumbai: पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त रस्ते व पुलांची आयआयटीमार्फत तपासणी

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आमदार सीमा हिरे यांनी केलेल्या सर्व मागण्यांवर आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. आतापर्यंत करण्यात आलेल्या कामांची संपूर्ण यादी आमदार सीमा हिरे यांना उपलब्ध करून द्यावी. सर्व कामे १०० टक्के पूर्ण झाली पाहिजेत. ज्या ठिकाणी वीजवाहिन्या भूमिगत करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसेल, त्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात. सर्व कामांना गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

बैठकीस महावितरण व महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, नाशिकचे जिल्हाधिकारी, नाशिक महानगरपालिका आयुक्त, संबंधित संचालक, मुख्य अभियंते, महावितरणचे अधीक्षक अभियंता तसेच इतर संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे व प्रत्यक्ष उपस्थित होते.

Tendernama
www.tendernama.com