Nashik: मनपा खत प्रकल्पाच्या खासगीकरणामुळे ८४ पदांवर संक्रांत

Nashik Municipal Corporation.
Nashik Municipal Corporation.Tendernama

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेत सध्या अग्निशमन व आरोग्य विभागातील ७०४ जागांच्या भरती प्रक्रियेसाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे मागील आठवड्यात अकरा विभागांच्या सेवाप्रवेश नियमावलीच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली. यामुळे महापालिकेत अडीच हजार रिक्त जागांना मान्यता मिळून लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार असतानाच त्याच महासभेत ऐनवेळच्या विषयांमध्ये खासगीकरणामुळे प्रशासनाने खत प्रकल्पावरील विविध संवर्गातील कार्यरत तब्बल ८४ जागा रद्द करण्यालाही मान्यता दिली आहे.

Nashik Municipal Corporation.
Pune : विद्यापीठ चौकात वर्षभरातच होणार उड्डाणपूल; असा आहे प्लॅन...

यामुळे रिक्त असलेल्या २५ जागा तत्काळ, तर कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर ५९ जागा व्यपगत होणार आहेत. प्रशासनाच्या या परस्परविरोधी धोरणामुळे सध्या आउटसोर्सिंगने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमुळे अन्य पदांवरही संक्रात येण्याची भीती व्यक्त होत आहे.

नाशिक महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाकडून खत प्रकल्प चालवला जातो. या प्रकल्पासाठी विविध संवर्गातील ८४ पदांना १२ ऑक्टोबर २००७ च्या शासन निर्णयानुसार मान्यता घेण्यात आली होती. या मान्यतेनुसार खत प्रकल्पावर कार्यरत कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देतानाच त्यांची नेमणूक घनकचरा व्यवस्थापन विभाग (खत प्रकल्प विभाग) येथे कायमस्वरूपी असेल. भविष्यात इतर विभागांत बदली अथवा पदोन्नतीसाठी हक्क सांगता येणार नाही, असे नियुक्तीपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.

Nashik Municipal Corporation.
Mumbai : ठेकेदाराचे 'कल्याण'; टेंडरपूर्वीच सुरु केलेले काम अंगलट

खत प्रकल्पावर सध्या ८४ मंजूर पदांपैकी ५९ अधिकारी, कर्मचारी कार्यरत होते, तर उर्वरित २९ पदे रिक्त होती. महापालिकेने २८ डिसेंबर २०१६ पासून खत प्रकल्पाचे खासगीकरण केले आहे. खत प्रकल्प तीस वर्षे मुदतीसाठी खासगी ठेकेदाराला चालवण्यासाठी देण्यात आले आहेत. त्यामुळे अन्य विभागांच्या सेवाप्रवेश नियमावलींना मंजुरी देतानाच महासभेने खत प्रकल्पावरील मंजूरसेवा प्रवेश नियम, तसेच ८४ पदे व्यपगत करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मान्यतेसाठी ऐनवेळच्या विषयांमध्ये समाविष्ट करण्यात आला.

Nashik Municipal Corporation.
Nashik ZP : पन्नास दिवसांत 90 कोटी खर्चाचे शिवधनुष्य पेलणार का?

महासभेने या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळे सध्या रिक्त असलेली २५ पदे तत्काळ रद्द झाली आहेत. त्याचप्रमाणे सध्या कार्यरत असलेले ५९ अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ती पदे आपोआप व्यपगत होतील. यामुळे सेवा प्रवेश नियमावलीला मान्यता देताना महासभेने २५०० पदांना मान्यता देण्याबरोबरच सध्या अस्तित्वात असलेली ८४ पदे रद्द केल्यामुळे कर्मचारी वर्गात नाराजी आहे.

Nashik Municipal Corporation.
Pune: विद्यापीठ चौकातील कोंडी 2 दिवसांत फुटणार, कारण...

ही पदे होणार रद्द
इलेक्ट्रीशियन - ४, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) - १,  वेल्डर - १, ऑटो इलेक्ट्रीशियन - २, स्टोअर कीपर लिपिक - २, सॉलिड वेस्ट टेक्नॉलॉजिस्ट - १, लिपीक, डेटा एंट्री ऑपरेटर - २, पोकलेन ऑपरेटर बॉबकॅट चालक - ८, डम्पर, जेसीबी चालक (ऑपरेटर) - १४, जीप, टँकर, ट्रक, टॅक्टर ऑपरेटर - ६, हायड्रोलिक मेकॅनिक - २, ऑटो मेकॅनिक - २, मेकॅनिकल फिटर, प्लम्बर - ४.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com