नाशिक महापालिका इमारत
NMC, NashikTendernama

Nashik: प्रमुख रस्ते खोदल्यानंतर आता गल्लीबोळातील रस्त्यांचेही खोदकाम

Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू असल्याने रस्ते खोदले आहेत. काही ठिकाणी विविध प्रकारच्या केबल, पाईपलाईन टाकण्यासाठी आधीच खोदकाम केल्याने रस्ते खराब झालेले आहेत. शहरात जवळपास २९ रस्त्यांची कामे सुरू असल्याने नाशिककरांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

त्यातच आता महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीने गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी गल्लीबोळातील २५० किलोमीटरचे रस्ते खोदण्याची नव्याने परवानगी मागितली आहे. यामुळे आता वर्षभर नाशिककरांच्या नशिबी खोदलेले रस्ते असणार आहे.

नाशिक महापालिका इमारत
WEF 2026: उत्तर महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी काय दिली चांगली बातमी?

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक शहरात जवळपास २ हजार कोटींचे रस्ते मंजूर केले असून त्यातील १३०० कोटींच्या कामांचे टेंडर प्रक्रियापूर्ण होऊन २९ कामे सुरू आहेत. कामे सुरू झाले आहेत. यामुळे नाशिक शहरातील जवळपास १९ रस्त्यांवर वाहतूक वळवण्यात आली असल्याने वाहनधारकांना लांबून वळसा घालून व वाहतूक कोंडीचा सामना करीत प्रवासकरावा लागत आहे.

नाशिक शहरात महानगर नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीकडून नाशिक शहरात गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम गेले तीन वर्षांपासून सुरू आहे. याशिवाय इतरही काही कंपन्या वेगवेगळ्या कारणांसाठी रस्ते खोदकामाची परवानगी मागत असतात. यामुळे नाशिक शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब झाले आहेत.

नाशिक महापालिका इमारत
Nashik: महामेट्रोच्या सर्वेक्षणात नाशिक शहर मेट्रोसाठी पात्र; निओ मेट्रो बासनात

सुरुवातीला एमएनजीएलला नाशिक शहरात २५४ किलोमीटर लांबीचे रस्ते खोदण्याची परवानगी दिली. त्यानंतर दिवाळीपूर्वी १८० किलोमीटर लांबीचे रस्ते खोदण्याचीची परवानगी मागितली.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे केली जाणार आहे. हे रस्ते तयार झाल्यानंतर पुन्हा खोदकाम होऊन रस्त्यांची गुणवत्ता ढासळू नये यासाठी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी रस्त्यांची कामे सुरू होण्यापूर्वीच विविध प्रकारच्या केबल टाकण्यासाठी डक्ट टाकणे, पाइपलाइन टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे सध्या एमएनजीएलसह सहा एजन्सीच्या माध्यमातून शहरात रस्ते खोदकाम काम सुरू आहे.

नाशिक महापालिका इमारत
Nashik: प्रजासत्ताकदिनी 75 हजार कुटुंबांचा नव्या घरकुलात प्रवेश

स्मार्टसिटी कंपनीकडूनदेखील सीसीटीव्ही बसवण्यासाठी व इंटरनेट नेटवर्कचे जाळे निर्माण करण्यासाठी ऑप्टिकल फायबर केबलसाठी खड्डे खोदले जात आहेत. यामुळे नाशिक शहरात सर्वदूर भागात २९ रस्त्यांचे डांबरीकरण आणि क्रॉक्रिटीकरणासाठी सुरू असलेले खोदकाम व इतर कंपन्यांचे खोदकाम सुरू असतानाच एमएनजीएल कंपनीने नव्याने २५० किलोमीटरचे रस्ते फोडण्याची परवानगी मागितली आहे.

नाशिक महापालिका इमारत
Nashik: साधुग्रामच्या भूसंपादनासाठी महापालिकेला हवेत 2400 कोटी?

अर्थात हे रस्ते खोदकाम आता प्रमुख रस्त्यांवर केले जाणार नाही. शहरातील उपनगरे व नागरी वस्ती भागातील छोट्या गल्ल्यांमधील रस्ते खोदकाम करण्याची परवानगी मागितली आहे.

महापालिकेने अद्याप त्यांना परवानगी दिली नसून सध्या सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीनुसार विचार करून निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेने परवानगी दिल्यानंतर संपूर्ण शहरात खोदकाम सुरू असल्याचे दृष्य दिसणार आहे.

Tendernama
www.tendernama.com