Nashik Ring Road: नाशिक रिंगरोडचे आरेखन करणाऱ्या कंपनीची का होणार चौकशी?

 नाशिक रिंगरोडमध्ये मोठा गैरव्यवहार
Nashik Ring Road Scam, kumbh mela infraTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारण्यात येणा-या रिंगरोड तथा सिंहस्थ परिक्रमा मार्गाचे आरेखन निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या कामाचे कंत्राट दिलेल्या एकम कंपनीच्या कंपनीच्या संचालकानेच गौळाणे गावात मोक्याची जमीन खरेदी करीत स्वत:च्या फायद्यासाठी त्या आरेखनात बदल करून ती जमीन भूसंपादनात घुसवून रिंगरोडच्या फ्रंटला आणली असल्याची तक्रार आमदार सरोज अहिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी व कुंभमेळा प्राधिकरण यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची एकसदस्यीय समिती नेमली आहे.

 नाशिक रिंगरोडमध्ये मोठा गैरव्यवहार
Nashik Ring Road: नाशिकचा 7,600 कोटींचा रिंगरोड सिंहस्थापूर्वी पूर्ण होणे अशक्य? काय आहेत कारणे?

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रिंगरोड उभारण्याची जबाबदारी महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे आहे. या रिंगरोडसाठी आरेखन करण्यासाठी एकम या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. एकम या कंपनीचे संचालक सचिन चिंतावार व स्वप्निल चिंतावर यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये गौळाणेत १३८ गुंठे (गट क्र. ११/५, ११/६) जमीन खरेदी केली आहे.

या कंपनीने ठरवून दिलेल्या आरेखनानुसार गट निश्चित करून त्या गटांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयास दिली. त्यानंतर भूसंपादन विभागाने डिसेंबर २०२५ रोजी त्याची नोटीस प्रसिद्ध करून संबंधित गटातील मालकांना नोटीस दिली. मात्र, हे करताना त्यांनी गौळाणे येथील गट क्र. ११/६ या स्वमालकीच्या भूखंडाचा त्या यादीत समावेश केला नाही.  

दरम्यान प्रशासनाने त्या गावातील शेतक-यांशी चर्चा करून त्यांच्या संमतीने १४ मे २०२६ रोजी गौळाणेतील भूसंपादन करण्यात येणा-या गटांची अंतिम भूसंपादन यादी प्रसिद्ध केली. त्या यादीतही ११/६ या गटाचा समावेश नव्हता. मात्र, त्यानंतर १० दिवसांनी गौळाणेतील रिंगरोडच्या आरेखनात बदल करून गट क्रमांक ११/६ या जमिनीचा समावेश करण्यात आला आहे.

 नाशिक रिंगरोडमध्ये मोठा गैरव्यवहार
Nashik Ring Road: नाशिकरिंगरोडसाठी 14 गावांमध्ये थेट खरेदीने भूसंपादन; अधिसूचना निघाली

चिंतावर यांच्या मालकीच्या १३८ गुंठे क्षेत्रापैकी २१ गुंठे क्षेत्र या रिंगरोडसाठी संपादित केले जाणार असून उर्वरित ११७ हेक्टर क्षेत्र आता रिंगरोडला लागून आले आहे. यामुळे एकम कंपनीच्या संचालकांना रिंगरोडच्या आरेखनाचे काम मिळाण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर त्यांनी जमीन खरेदी केली असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी भूसंपादनाची अंतिम यादी प्रसिद्ध केल्यानंतर आपल्या संबंधाचा गैरफायदा उठवत, आपले क्षेत्र भूसंपादनाच्या यादीत आणून उर्वरित जमीन फ्रंटला आणून त्या जमिनीचे दर अनेक पटींनी वाढवण्यासाठी फायदा उठवल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

 नाशिक रिंगरोडमध्ये मोठा गैरव्यवहार
Nashik Ring Road Scam: नाशिक रिंगरोडमध्ये मोठा गैरव्यवहार! आरेखन करणाऱ्या चिंतावार बंधूंनी गौळाणे गावात घुसवलं स्वतःचं क्षेत्र

याबाबत आमदार सरोज अहिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय व नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण यांनी या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती शोधण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी रोहित राजपूत यांची समिती नेमली आहे.

या प्रकरणात एकम कंपनीचे चिंतावार यांनी त्यांना असलेल्या अधिकाराचा वापर स्वताच्या फायद्यासाठी केला का, याचा शोध घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Tendernama
www.tendernama.com