Nashik: फाळके स्मारकातील सेवा दुपटीने महागणार; काय आहे कारण?

Dadasaheb Phalke Memorial
Dadasaheb Phalke MemorialTendernama

नाशिक (Nashik) : येथील चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाचा (Dadasaheb Phalke Memorial) पुनविर्कास खासगीकरणाच्या माध्यमातून करण्यासाठी महापालिकेचे अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अनेक कारणांमुळे खासगीकरणास मोठा विरोध होत असल्यामुळे अखेर महापालिकेने यावर्षाच्या अंदाजपत्रकात हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीच्या (Ramoji Film City) धर्तीवर फाळके स्मारकाचा विकास करण्याचे निश्‍चित केले आहे.

यामुळे नाशिक महापालिका फिल्मसिटी उभारणार असल्याच्या चर्चा असतानाच स्वत: महापालिकेनेच आता तोट्याचे कारण देत प्रवेश शुल्कापासून तर कलादालनाच्या वापराच्या भाड्यासह इतर सगळेच दर दुप्पट करण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी मिळकत विभागाने महासभेकडे प्रस्ताव पाठवला आहे.

Dadasaheb Phalke Memorial
Nashik : जिल्ह्यात पाच एमआयडीसींसाठी 938 हेक्टर भूसंपादन होणार

चित्रपटमहर्षी यांचे जन्मस्थान नाशिक असल्यामुळे नाशिक महापालिकेने जवळपास २० वर्षांपर्वी दादासाहेब फाळके स्मारकाची उभारणी केली. सुरवातील या स्मारकाला नागरिकांचा चांगा प्रतिसाद होता. नंतर या स्मारकाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याची दुरवस्था होऊन नागरिकांनीही पाठ फिरवली. या काळात फाळके स्मारकाच्या देखभाल-दुरुस्तीवर साडेदहा कोटी रुपयांचा खर्च होऊनही या प्रकल्पाची दुरवस्था थांबण्याचे नाव घेत नाही.

यामुळे पीपीपी तत्त्वावर अर्थात खासगीकरणातून या प्रकल्पाचा पुनर्विकास करण्याची कल्पना तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी समोर आणली होती. त्यानुसार त्यांनी टेंडर प्रक्रियाही राबवली. मात्र, आयुक्तांचा प्रस्ताव विशिष्ट दिग्दर्शकासाठी समोर आणल्याची चर्चा होऊ लागली. तसेच हा व्यवहार महापालिकेसाठी आतबट्ट्याचा ठरणार असल्यामुळे तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार खासगीकरणाचे टेंडर रद्द करण्यात आले.

Dadasaheb Phalke Memorial
Nashik : जलजीवनच्या विहिरींसाठी नोटरीद्वारे जागा घेतलेल्यांचे काय?

त्यानंतर आलेले आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी २९ एकरावरील या स्मारकाच्या किरकोळ दुरुस्तीची कामे केली. यामुळे सध्या हे स्माकर नागरिकांसाठी खुले झाले आहे. मात्र, या स्मारकाच्या देखभालीसाठी होणारा खर्च व या स्मारकातून मिळणारे उत्पन्न यांचे प्रमाण व्यस्त असून महापालिकेला हे स्मारक चालवण्यातून महापालिकेला रोज ७१ हजार ८७४ रुपये तोटा होत असल्याचे मिळकत विभागाचे म्हणणे आहे.

मिळकत विभागाच्या म्हणण्यानुसार जुलै २०२२ व ऑगस्ट २०२२ चे एकूण उत्पन्न २ लाख ६१ हजार इतके असून याउलट याच दोन महिन्यांमधील वीजबिल व आस्थापना खर्च ४५ लाख ५० हजार ८२४ रुपये आहे. यामुळे हा तोटा कमी करण्यासाठी या स्मारकातील सेवांचे शुल्क वाढविण्याची गरज आहे.

यामुळे उत्पन्नवाढीसाठी फाळके स्मारकातील प्रवेश शुल्कासह वाहनतळ शुल्क, मिनी थिएटर भाडे, खुले रंगमंच व संपूर्ण परिसरात चित्रीकरणाचे दर वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

Dadasaheb Phalke Memorial
Pune : पुणेकरांची चांदी! उड्डाणे अन् कनेक्टिव्हिटी दोन्ही वाढणार

प्रस्तावित दरवाढ


प्रकार....................पूर्वी...........सुधारित

प्रवेश शुल्क (वय वर्ष १८च्या आत) : ०५ रुपये - १० रुपये

प्रवेश शुल्क (१८ वर्षांवरील) : १० रुपये - २० रुपये

दुचाकी वाहनतळ : ०५ रुपये - १० रुपये

तीनचाकी वाहनतळ : ०५ रुपये - २० रुपये

चारचाकी वाहनतळ : १० रुपये - २० रुपये

बस वाहनतळ : २० रुपये - ४० रुपये

मिनी थिएटर : १००० रुपये - २००० रुपये

खुला रंगमंच : १००० रुपये - २००० रुपये

कलादालन हॉल :२००० रुपये - ४००० रुपये

चित्रीकरण : ३००० रुपये - ६००० रुपये

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com