Nashik: आधीच्या निर्लेखित न केलेल्या इमारतीच्या जागेवर कसे बांधणार नवीन उपकेंद्र?

Nashik ZP
Nashik ZPTendernama
Published on

नाशिक (Nashik): चांदवड तालुक्यातील धोडांबे येथील प्राथमिक उपकेंद्राची इमारत २५ वर्षांपेक्षा कमी वयाची असून, ती इमारत धोकादायक असल्याचा बांधकाम विभागाचा अहवाल सादर झालेला नाही. तरीही आरोग्य विभागाने ही इमारत पाडून तेथे नवीन इमारत बांधण्यास राष्ट्रीय आरोग्य अभियानला परवानगी दिली आहे. यावरून जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभिमान(एन एच एम) यांचा अनागोंदी कारभार उघडकीस आला आहे.

Nashik ZP
PM मोदींचे महाराष्ट्राला मोठे गिफ्ट! 4 राज्यांना काय दिली खुश खबर?

यापूर्वी राष्ट्रीय आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग ही इमारत नवीन बांधण्यासाठी ४८ लाख रुपये व दुरुस्तीसाठी ४० लाख रुपये खर्च करीत असल्याची बाब 'टेंडरनामा'ने उघडकीस आणली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेने दुरुस्तीचा निर्णय मागे घेऊन सुस्थितीत असलेली इमारत पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

Nashik ZP
Nashik: सिंहस्थातील विकासकामांमध्ये पंजाब सरकारचीही उडी; काय घेतला निर्णय?

ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकार जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभाग व केंद्र सरकारचा राष्ट्रीय आरोग्य अभियान या दोन संस्था आरोग्यसेवा पुरवत असतात. या दोन्ही विभागांचे जिल्हा स्तरावरील प्रमुख हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत ११० प्राथमिक य आरोग्य केंद्र व ५०० पेक्षा अधिक आरोग्य उपकेंद्र चालवले जातात.

या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांचे नवीन बांधकाम करणे, दुरुस्ती करणे ही कामे प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची असतात. त्याचवेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या माध्यमातूनही कामे केली जातात. 

प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र यांच्या बांधकामासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाने मंजूर केलेल्या निधीतील कामे त्यांच्या कार्यकारी अभियंत्याकडून राबवली जातात, तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची ही कामे त्यांच्या बांधकाम विभागाकडून केली जातात.

रंगकाम करून पैसे काढणार?

यापूर्वीही जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेक सदस्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान नवीन इमारतीच्या नावाखाली केवळ रंगरंगोटी करून देयके काढून2घेत असल्याचे आरोप करीत चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, हा विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अखत्यारित असल्याने सदस्य त्यात फार काही करू शकले नाहीत.

आता निर्लेखन केलेल्या इमारतीच्या जागेवर नवीन इमारतीसाठी टेंडर प्रसिद्ध करण्याचा प्रकार त्याच हेतूने असल्याचे बोलले जात असून जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागही त्याला हातभार लावत असल्याचे दिसत आहे.

Nashik ZP
Nashik: नाशिक-पालघर प्रवास आता सुसाट!

चांदवड तालुक्यातील धोडांबे येथील उपकेंद्र इमारतीच्या दुरुस्तीसाठी आरोग्य विभागाने २०२५-२६ या वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून आमदार डॉ. राहुल आहेर यांनी सूचवल्याप्रमाणे ४० लाख रुपये निधीतून दुरुस्तीच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्याचवेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानने खासदार भास्कर भगरे यांनी सुचवल्यानुसार याचठिकाणी ४८लाख रुपयांची नवीन इमारत मंजूर करून टेंडर प्रसिद्ध केले. म्हणजे एकाच उपकेंद्राची आरोग्य विभाग दुरुस्ती करणार, असा अजब प्रकार 'टेंडरनामा'ने उघडकीस आणला.

यानंतर खरे तर कामाची द्विरुक्ती टाळण्यासाठी एनएचएमने प्रसिद्ध केलेले टेंडर रद्द करून नवीन इमारत बांधण्याची प्रशासकीय मान्यता रद्द करणे नियमाला धरून होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने त्या उपकेंद्राच्या दुरुस्तीसाठी दिलेली प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे. यामुळे भलतेच प्रश्न निर्माण झाले आहेत.

Nashik ZP
BMC Tender: वेस्टर्न फ्रीवे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी चांगली बातमी

धोडांबे येथील उपकेंद्र इमारत जीर्ण अथवा खूप जुनी झालेली नाही. यामुळे तिचे निर्लेखन करण्यात आलेले नसताना राष्ट्रीय आरोग्य अभियान ती इमारत पाडून तेथे नवीन इमारत कशी उभारणार? जिल्हा परिषदेने इमारत निर्लेखन केलेली नसताना राष्ट्रीय आरोग्य अभियानने तेथे नवीन इमारत कशी प्रस्तावित केली? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे जिल्हा आरोग्य विभागाकडे नाहीत. मात्र, जी इमारत पाडण्याएवढी जुनी झालेली नसताना व ज्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नसताना तिचे निर्लेखन जिल्हा परिषद कोणत्या नियमाने करणार, या प्रश्नाचे उत्तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोरे यांच्याकडे नाही.

यामुळे आम्ही दुरुस्तीची प्रशासकीय मान्यता रद्द केल्याने आता एका इमारतीवर दोनदा खर्च होणार नाही, असे उत्तर देऊन अधिक बोलण्याचे टाळत आहेत. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com